Join us

राज्यात १ लाख ८८ हजार रुग्ण उपचाराधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:05 AM

मुंबई - राज्यात शनिवारी १३,६५९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ३०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे ...

मुंबई - राज्यात शनिवारी १३,६५९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ३०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे तर २१ हजार ७७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण ५५ लाख २८ हजार ८३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०१ टक्के एवढे झाले आहे. सध्या १ लाख ८८ हजार २७ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर १.७१ टक्के एवढा आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,१९,२२४ झाली असून, मृतांचा एकूण आकडा ९९ हजार ५१२ आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६२,७१,४८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.०४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १४,००,०५२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर, ७,०९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील २१ जिल्ह्यात शनिवारी एकही दैनंदिन मृत्यूची नोंद झालेली नसल्याचे दिसून आले. दिवसभरात नोंद झालेल्या एकूण ३०० मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर, ८९ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. या ३०० मृत्यूंमध्ये मुंबई २९ , नवी मुंबई मनपा २, कल्याण-डोंबिवली मनपा १, रायगड ५, नाशिक १०, नाशिक मनपा १२, अहमदनगर १४, जळगाव १, जळगाव मनपा १, पुणे १८, पुणे मनपा १०, पिंपरी-चिंचवड मनपा १, सोलापूर ७, सोलापूर मनपा १, सातारा १७, कोल्हापूर ४५, कोल्हापूर मनपा १३, सांगली १७, सांगली मिरज कूपवाड मनपा १, सिंधुदुर्ग १३, रत्नागिरी १५, औरंगाबाद ४, परभणी २, लातूर ६, लातूर मनपा १, उस्मानाबाद ८, बीड ८, अकोला ७, अकोला मनपा ४, अमरावती ४, यवतमाळ ३, बुलडाणा ३, वाशिम १, नागपूर २, नागपूर मनपा ३, वर्धा २, भंडारा १, चंद्रपूर २, चंद्रपूर मनपा ३, गडचिरोली ३ इ. रुग्णांचा समावेश आहे.