१ लाख ९२ हजार शेतकरी वीज बिलांतून थकबाकी मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:07 AM2021-03-26T04:07:09+5:302021-03-26T04:07:09+5:30

मुंबई : महावितरणच्या थकबाकी मुक्ती योजनेत ८ लाख ६ हजार १०५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून गुरुवारपर्यंत त्यातील १ लाख ...

1 lakh 92 thousand farmers are free from arrears of electricity bills | १ लाख ९२ हजार शेतकरी वीज बिलांतून थकबाकी मुक्त

१ लाख ९२ हजार शेतकरी वीज बिलांतून थकबाकी मुक्त

Next

मुंबई : महावितरणच्या थकबाकी मुक्ती योजनेत ८ लाख ६ हजार १०५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून गुरुवारपर्यंत त्यातील १ लाख ९२ हजार ५२९ शेतकऱ्यांनी मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा भरणा करून १०० टक्के थकबाकीमुक्ती मिळविली आहे. या थकबाकी मुक्त शेतकऱ्यांना वीजबिलांतून २५५ कोटी २ लाख रुपयांची सवलत मिळाली आहे.

सद्य:स्थितीत १ लाख ९२ हजार ५२९ शेतकऱ्यांनी चालू व थकीत वीजबिलांपोटी ३३० कोटी ४२ लाख रुपयांचा भरणा करून वीजबिलांतून संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळविली आहे. या शेतकऱ्यांनी सुधारित मूळ थकबाकीच्या ५० टक्के रकमेचा एकरकमी म्हणजे २५५ कोटी २ लाख रुपयांसह चालू वीजबिलांच्या ७५ कोटी ४० लाख रुपयांचा भरणा केला आहे. या सर्व शेतकऱ्यांना सुधारित मूळ थकबाकीमध्ये तब्बल २५५ कोटी २ लाख रुपयांची सूट मिळाली आहे.

कृषी वीजबिल थकबाकीमुक्तीच्या महाकृषी ऊर्जा अभियानात आतापर्यंत ८ लाख ६ हजार १०५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. त्यांनी कृषिपंपाच्या थकीत व चालू वीजबिलांपोटी ७४१ कोटी ४ लाख रुपयांचा भरणा केला आहे.

------------------

थकबाकीमुक्त शेतकरी

पुणे – ८४ हजार ४५५

कोकण - ६८ हजार ६७

नागपूर - ३० हजार २१९

औरंगाबाद ९ हजार ७८८

------------------

Web Title: 1 lakh 92 thousand farmers are free from arrears of electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.