Join us

म्हाडाच्या मुंबई विभागाच्या लॉटरीसाठी १ लाख अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 5:58 AM

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १,३८४ घरांच्या लॉटरीसाठी आतापर्यंत १ लाख अर्ज दाखल झाले आहेत.

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १,३८४ घरांच्या लॉटरीसाठी आतापर्यंत १ लाख अर्ज दाखल झाले आहेत. याआधी झालेल्या कोकण मंडळाच्या लॉटरीत मिळालेल्या कमी प्रतिसादामुळे मुंबई लॉटरीवर याचा परिणाम होतो की काय, अशी भीती असतानाच मुंबइच्या लॉटरीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपण्याआधीच १ लाख अर्जदारांनी नोंदणी केली आहे. आॅनलाइन अर्जांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाहा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.म्हाडाने ग्रँटरोडसारख्या ठिकाणी ५ कोटींची महागडी घरे विक्रीसाठी ठेवली असली, तरी अशी महागडी घरे वगळता मुलुंडमधील गव्हाणपाडा, सायनमधील प्रतीक्षानगर, बोरीवली, चांदवलीतील अत्यल्प आणि अल्प गटातील घरांना आॅनलाइन लॉटरीत चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबई मंडळाच्या १ हजार ३८४ घरांच्या लॉटरीसाठी मंगळवारी ६ वाजेपर्यंत १ लाख ३७ हजार ९२ अर्ज दाखल झाले. ९७ हजार ७२० अर्जदारांनी आॅनलाइन नोंदणी पूर्ण केलीे. यातील ९५ हजार १७९ अर्ज मंजूर झाले आहेत. तर संकेतस्थळ वापरणाऱ्यांची संख्या १ लाख ५५ हजार ८२१ आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत १० डिसेंबर आहे. १६ डिसेंबरला लॉटरीचा निकाल जाहीर होईल.

टॅग्स :म्हाडा