मुंबई :
विनंती अर्जावरून कर्मचाऱ्याची बदली झाली. मात्र बदली आदेशाची प्रत देण्यासाठी वरिष्ठ लिपिकाने एक लाखाच्या लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार दुग्ध व्यवसाय विकास विभागात समोर आला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने प्रशांत दामोदर अहिर याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची विनंती अर्जावरून बदली झाली होती. मात्र, बदली आदेशाची प्रत देण्याकरीता अहिरने एक लाखांची मागणी केली. तक्रारदार यांनी गेल्यावर्षी याबाबत ८ डिसेम्बर ते ९ डिसेम्बर रोजी एसीबीकडे तक्रार दिली. त्यानुसार, पडताळणीत तडजोडी अंती ५० हजारांची मागणी केली. पुढे, ३० हजारांपर्यंत आला. अखेर, एसीबीने शुक्रवारी याप्रकरणी कलम ७, ७ (अ) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करत अधिक तपास करत आहे.