डबेवाले व सिनेसृष्टीतील गरजूंना १ लाख किलो अन्नधान्याचे वाटप होणार, अमेरिकन दुतावासाचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 07:09 PM2020-06-24T19:09:16+5:302020-06-24T19:10:09+5:30
अन्नधान्य योजनेत शेफ विकास खन्ना यांच्यासोबत सहभागी होण्याचा निर्णय मुंबईतील अमेरिकन वाणिज्यदूतावासाने घेतला आहे.
मुंबई : मुंबईतील डबेवाला व मनोरंजन क्षेत्रातील गरजूंना लॉकडाऊन कालावधीत पुरवण्यात येणाऱ्या (उत्सव) या अन्नधान्य योजनेत शेफ विकास खन्ना यांच्यासोबत सहभागी होण्याचा निर्णय मुंबईतील अमेरिकन वाणिज्यदूतावासाने घेतला आहे. फीड इंडिया अंतर्गत हे वाटप केले जाईल.
डेव्हिड रँझ हे मुंबईतील दोन हजार डबेवाले व 3 हजार मनोरंजन क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अन्न व इतर वस्तुंचे वाटप करणार आहेत. टीव्ही क्षेत्रातील सिंटा या संघटनेचा देखील यामध्ये समावेश आहे. एक लाख किलो पेक्षा जास्त अन्न या द्वारे वाटप करण्यात येईल. 26 जून रोजी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात हे वाटप करण्यात येईल. याबाबत रँझ म्हणाले, अशा प्रकारच्या मोहिमेमध्ये सहभागी होण्याबाबत मला आनंद वाटत आहे. या मोहिमेद्वारे गरजुंना सध्याच्या कठिण परिस्थितीत आवश्यक वस्तु मिळू शकतील. खन्ना म्हणाले, मी दोन महिन्यांपूर्वी या मोहिमेला प्रारंभ केला. अमेरिकन वाणिज्यदूत यामध्ये सहभागी होणार असल्याने अधिकाधिक गरजुंपर्यंत पोचणे आम्हावा शक्य होईल. खन्ना यांच्या फीड इंडिया द्वारे आतापर्यंत मुंबई,वाराणसी,बेंगळुरु,मेंगलोर, कोलकाता यासह 135 पेक्षा अधिक शहरातील 14 दशलक्ष पेक्षा जास्त जणांना जेवण देण्यात आले आहे.