एफसीएफएसच्या तिसऱ्या टप्प्यासाठी १ लाख जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 06:54 AM2019-08-27T06:54:57+5:302019-08-27T06:55:01+5:30
अकरावी प्रवेश प्रक्रिया; विद्यार्थी आज करू शकणार महाविद्यालयाची निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावी प्रवेश प्रक्रियेची प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य फेरी (एफसीएफएस) सुरू असून याच्या दुसºया प्रकारातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सोमवारी संपली. तिसºया प्रकारातील विद्यार्थ्यांना मंगळवारी प्रवेशासाठी महाविद्यालय निवडण्याची संधी मिळेल.
एफसीएफएसच्या तिसºया प्रकारातील प्रवेशासाठी एकूण १ लाख २ हजार ५९७ जागा उपलब्ध आहेत. यामध्ये कला शाखेच्या १४,५४८; वाणिज्यच्या ४५,४३२; विज्ञान शाखेच्या ४०,०६५ आणि एमसीव्हीसीच्या २,५५२ जागा आहेत. कोट्याच्या जागांची संख्या २७,५८१ आहे.
प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य (प्रकार २) फेरीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी २३ आॅगस्ट रोजी कनिष्ठ महाविद्यालयाची निवड केली होती त्यांना २३ आॅगस्ट आणि २६ आॅगस्ट दुपारी १ वाजेपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा होता. यंदा दहावी उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी, आधीचे प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी, ज्यांना अद्याप कोणत्याही महाविद्यालयांत प्रवेश मिळाला नाही असे सर्व विद्यार्थी या फेरीसाठी पात्र ठरतील.
एफसीएफएस (प्रकार ३) फेरीचे वेळापत्रक
च्२७ आॅगस्ट - सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत - विद्यार्थी एफसीएफएस पॅनलद्वारे कनिष्ठ महाविद्यालय निवडू शकतील.
च्२७ ते २८ आॅगस्ट - सकाळी १० ते सायंकाळी ५ आणि २८ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजेपर्यंत - एफसीएफएसमध्ये पॅनलद्वारे मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जाऊन प्रवेश निश्चिती करणे.
एफसीएफएस (प्रकार ३) साठी उपलब्ध जागा
कला - १४,५४८
वाणिज्य - ४५,४३२
विज्ञान - ४०,०६५
एमसीव्हीसी - २,५५२
एकूण - १,०२,५९७
कोट्याच्या रिक्त जागा
इनहाउस - ५,१२१
अल्पसंख्याक - १४,५०१
व्यवस्थापन - ७,९५९
एकूण - २७,५८१