सीट बेल्टच्या नियमाची 'डेड लाईन' ठरली! कारच्या मागील सीटला बेल्ट बसवून घ्या अन्यथा भरा इतका दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 04:26 PM2022-11-03T16:26:21+5:302022-11-03T16:27:03+5:30
टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा गुजरातहून मुंबईकडे येत असताना अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर कारमधील मागील सीट बेल्ट संदर्भात चर्चा सुरू झाली होती.
टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा गुजरातहून मुंबईकडे येत असताना अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर कारमधील मागील सीट बेल्ट संदर्भात चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानेही मागील सीट बेल्ट लावणे बंधनकारक केले होते. यानंतर मुंबईतही मागील सीट बेल्टचा नियम लागू करण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
१ नोव्हेंबरपासून मुंबईत मागील सीट बेल्टचा नियम आता १० नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. नागरिकांना जागरुक करण्यासाठी हा नियम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. या नव्या नियमा संदर्भात लोकांना जागरुक करण्यात येणार असून टीव्ही, रेडियो तसेच सोशल मीडियावरुन नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे.
शाब्बास पोरी! आठवड्यातून फक्त 2 दिवस अभ्यास करुन 'तिने' UPSC मध्ये मिळवलं घवघवीत यश
मागील सीटचा बेल्ट लावण्यासाठी सूचना दिली आहे. हा नियम १ नोव्हेंबरपासून लागू करण्यातल येणार होता. आता १० नोव्हेंबरपासून मागील सीटचा बेल्ट लावला नाहीतर आपल्याला २०० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तसेच आता टु व्हीलर वाहनाधारकांनाही हेलमेट सक्तीचे करण्यात येणार आहे.
टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर देशभरात मागील सीट बेल्टची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानेही मागील सीट बेल्ट लावणे आवश्यक केले आहे. या आदेशानंतर दिल्लीत तात्काळ हा नियम लागू करण्यात आला आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर १ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. १४ सप्टेंबर रोजी लागू झालेल्या या नियमाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दंड केले होते.