हरित ऊर्जाक्षेत्रात १.२९ लाख कोटींची गुंतवणूक, ३६ हजार रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 06:31 AM2024-09-27T06:31:19+5:302024-09-27T06:45:18+5:30

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले करार

1 point 29 lakh crore investment in green energy sector 36 thousand employment | हरित ऊर्जाक्षेत्रात १.२९ लाख कोटींची गुंतवणूक, ३६ हजार रोजगार

हरित ऊर्जाक्षेत्रात १.२९ लाख कोटींची गुंतवणूक, ३६ हजार रोजगार

मुंबई : हरित ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्रात १ लाख २९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून, त्यासंबंधीच्या सामंजस्य करारांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत गुरुवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.  
 
जलविद्युत ऊर्जानिर्मितीसाठीच्या पंम्प्ड स्टोअरेज प्रकल्पासाठी ८२ हजार २९९ कोटींची गुंतवणूक असलेल्या व १८ हजार ४४० रोजगार निर्मिती होणार असलेल्या तीन कंपन्यांसोबत सह्याद्री अतिथिगृह येथे सामंजस्य करार करण्यात आले. 

पंप स्टोअरेज सामंजस्य करार 
कंपनी    गुंतवणूक     रोजगार     वीजनिर्मिती 
एसजेव्हीएन लि.    ४५.६३५ कोटी     ७२४०    ८१०० मेवॉ. 
(५ ठिकाणी : कोलमानपाडा, सिदगड, चोरनाई, वैतरणी, जलवारा) 
मेघा इंजिनिअरिंग     २०,१०० कोटी     ३०००     ४००० मेवॉ. 
(२ ठिकाणी : कामोद, घोसळा) 
जेएसडब्ल्यू लि.     १६,५६४ कोटी     ८२००    ३००० मेवॉ. 
(२ ठिकाणी : भावली, पाने) 

हरित ऊर्जा क्षेत्रात झालेले करार 
कंपनी    गुंतवणूक     रोजगार
आरईसी पॉवर     ३००० कोटी     १६६३ 
टीएचडीसी इंडिया लि.     २९,३२५ कोटी     १४,१३० 
एचपीसीएल     १२,००० कोटी     १६३५ उरण 
पॉवर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडिया     २९,३२५ कोटी     १४१३० 
महाजेनको आणि एसजेव्हीएन     ३०३० कोटी     १४०० 
(निम्नवर्धा, जिल्हा अमरावती फ्लोटिंग सौर उर्जा प्रकल्प)

पंम्प्ड स्टोअरेज क्षेत्रात वीजनिर्मिती करण्यासाठी हे करार झाल्याने हरितऊर्जा क्षेत्रात राज्याचे हे मोठे पाऊल असेल. या करारांमुळे १५,१०० मेगावॉट वीजनिर्मिती होईल    - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

काेणासाेबत झाले करार?

उदंचन जलविद्युत प्रकल्पासंदर्भात जलसंपदा विभाग आणि एसजेवीएन लिमिटेड, जेएसडब्ल्यू एनर्जी लि. आणि मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा लि. यांच्यातील सामंजस्य करारप्रसंगी जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव डॉ. संजय बेलसरेे, आदी उपस्थित होते. पम्प्ड स्टोअरेज सामंजस्य करारावरही स्वाक्षरी करण्यात आल्या. याशिवाय आणखी ४७ हजार ५०० कोटींची गुंतवणूक व १८ हजार ८२८ रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट असलेले करार चार कंपन्यांसोबत करण्यात आले.  

यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, महाराष्ट्रात विद्युत वितरण मंडळ या सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, ऊर्जा विभागाचे सहसचिव नारायण कराड उपस्थित होते.
 

Web Title: 1 point 29 lakh crore investment in green energy sector 36 thousand employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.