मुंबईत दिवसभरात १ हजार २६६ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:06 AM2021-05-28T04:06:43+5:302021-05-28T04:06:43+5:30
मुंबई : मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९४ टक्क्यांवर आला असून रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ३५१ दिवसांवर पोहोचला आहे. ...
मुंबई : मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९४ टक्क्यांवर आला असून रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ३५१ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत दिवसभरात १ हजार २६६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत मृतांची संख्याही गेली अनेक दिवस चढ उतार करत आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी सध्या २८ हजार ३१० सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत केवळ ८५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. हाच आकडा बुधवारी १ हजार २१ इतका होता. कोरोनामुक्तांची संख्या कमी होणे ही मुंबईकरांसाठी चिंतेची बाब आहे. मुंबईत आतापर्यंत ६ लाख ५७ हजार ३०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबईत २८ हजार ४८० कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १ हजार २६६ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. मुंबईत ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हीच संख्या बुधवारी ३४ इतकी होती. मुंबईत २० मे ते २६ मे पर्यंतचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा दर ०.१९ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या ४१ सक्रिय कंटेनमेंट झोन तर १७९ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.