Join us

मुंबई महानगरात दिवसभरात १ हजार ६२४ युनिट रक्तसंकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘लोकमत’ने साद घातली की राज्यभरातील नागरिक प्रतिसाद देतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘लोकमत’ने साद घातली की राज्यभरातील नागरिक प्रतिसाद देतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कारण ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या रक्तदानाच्या महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, एकट्या मुंबई महानगर क्षेत्रात रविवारी तब्बल १ हजार ६२४ युनिट रक्तसंकलन करण्यात आले.

कोरोनाकाळात राज्यात ठिकठिकाणी रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘लोकमत’ने ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त दि. २ ते १५ जुलै या कालावधीत ‘रक्ताचं नातं’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. विविध संस्था आणि संघटनांच्या सहकार्याने राज्यभरात रक्तदानाचा महायज्ञ अखंड सुरू आहे. यात आतापर्यंत मुंबई आणि महानगर परिसरात तब्बल ४,६६२ युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे.

.......

मुंबई @ ७१३

भांडुपमध्ये १४२, मुलुंड ६९, घाटकोपर ६०, बोरिवली पूर्व ७७, दादर ९२, गिरगाव ३७, बोरिवली पाश्चिम ५९, अंधेरी पश्चिम ४४, जुहू २८, मालाड १७, गोराई २०, गोरेगाव पश्चिम २५, जोगेश्वरीमध्ये ४३ दात्यांनी रक्तदान केले. मुंबई शहर आणि उपनगरात मिळून ७१३ युनिट रक्तसंकलन करण्यात आले.

.....

पालघरमध्ये १५६ बाटल्या रक्तसंकलन

पालघर जिल्ह्यात रविवारी तीन ठिकाणी ‘लोकमत रक्ताचं नातं’ उपक्रम राबविला गेला. क्षितीज ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नालासोपारा पूर्व आणि पश्चिम येथे झालेल्या दोन शिबिरांत एकूण १०४ बाटल्या, तर बोईसर येथे रोटरी क्लब ऑफ बोईसरच्या सहकार्याने पार पडलेल्या उपक्रमात ५२ बाटल्या रक्तसंकलन झाले.

......

ठाणे जिल्ह्यात जपले ‘सामाजिक भान’

‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत डोंबिवलीत शिवसेनेच्या पुढाकाराने रविवारी दोन ठिकाणी रक्तदान शिबिरे झाली. पूर्वेतील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत झालेल्या रक्तदान शिबिरात ६५ दात्यांनी रक्तदान केले. तर पलावा खोणी येथे झालेल्या शिबिरात ५४ दात्यांनी रक्तदान केले. ठाण्यात मनविसे ओवळा माजिवडा विधानसभेच्यावतीने लोकमान्यनगर येथील रा. ज. ठाकूर विद्यामंदिर येथे रविवारी रक्तदान शिबिर पार पडले.

......

नवी मुंबईत विक्रम!

लोकमत व नवी मुंबई शिवसेना यांच्यावतीने सानपाडा येथे आयोजित रक्तदान शिबिरात नवा विक्रम प्रस्थापित झाला. एकाच दिवशी या ठिकाणी तब्बल ४०६ दात्यांनी रक्तदान केले. यात पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, सुरक्षारक्षक, कामगार, व्यावसायिक, महाविद्यालयीन तरूण, लोकप्रतिनिधी यांचा सहभाग होता.