राज्यात काेराेनाचे १ हजार ९२४ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:08 AM2021-01-19T04:08:15+5:302021-01-19T04:08:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात साेमवारी दिवसभरात काेराेनाच्या नव्या १ हजार ९२४ रुग्णांचे निदान झाले असून, ३५ मृत्यूंची ...

1 thousand 924 new patients of Kareena in the state | राज्यात काेराेनाचे १ हजार ९२४ नवे रुग्ण

राज्यात काेराेनाचे १ हजार ९२४ नवे रुग्ण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात साेमवारी दिवसभरात काेराेनाच्या नव्या १ हजार ९२४ रुग्णांचे निदान झाले असून, ३५ मृत्यूंची नोंद झाली. मागील काही दिवसांच्या तुलनेत सोमवारी दैनंदिन रुग्णसंख्या आणि मृत्यूंत घट झाली. आतापर्यंत १८ लाख ९० हजार ३२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.८६ टक्के झाले आहे. सध्या ५० हजार ६८० रुग्ण उपचाराधीन आहेत.

राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या १९ लाख ९२ हजार ६८३ झाली असून, बळींचा आकडा ५० हजार ४७३ झाला आहे. साेमवारी दिवसभरात नोंद झालेल्या एकूण ३५ मृत्यूंपैकी २१ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर दोन मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १२ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३८,४५,८९७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,९२,६८३ (१४.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२१,२८० व्यक्ती होमक्वारंटिनमध्ये आहेत तर २,०९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटिनमध्ये आहेत.

* सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात

पुण्यात सर्वाधिक १५ हजार ४१७ एवढे सक्रिय रुग्ण आहेत. त्याखालोखाल, ठाण्यात ९ हजार ६०८ असून, तर मुंबईत ६ हजार ६७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात दिवसभरात नोंद झालेल्या ३५ मृत्यूंमध्ये मुंबई ७, ठाणे मनपा १, नाशिक मनपा १, मालेगाव मनपा १, अहमदनगर मनपा १, जळगाव १, पुणे मनपा १, पिंपरी चिंचवड मनपा ३, सोलापूर २, सोलापूर मनपा १, सातारा १, सांगली मिरज कुपवाड मनपा १, औरंगाबाद मनपा १, यवतमाळ १, नागपूर ५, नागपूर मनपा १, वर्धा ३, भंडारा २, चंद्रपूर मनपा १ या रुग्णांचा समावेश आहे.

.....................

Web Title: 1 thousand 924 new patients of Kareena in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.