वर्षभरात 'इंडिगो'च्या विमानाने १० कोटी प्रवाशांचे उड्डाण; जगातील Top 10 विमान कंपन्यांत प्रवेश
By मनोज गडनीस | Published: December 19, 2023 08:25 PM2023-12-19T20:25:59+5:302023-12-19T20:26:16+5:30
२०२२ मध्ये कंपनीच्या विमानाद्वारे एकूण ७ कोटी ८० लाख लोकांनी प्रवास केला होता.
मनोज गडनीस, मुंबई: सरत्या वर्षात विमानाने प्रवास करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत विक्रमी वाढ झालेली असतानाच दुसरीकडे आता देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगो कंपनीने एका वर्षात तब्बल १० कोटी प्रवाशांना विमान सफर घडवत नवा विक्रम रचला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने प्रवासी वाहतूक केल्यामुळे कंपनी देशात तर अव्वल ठरली आहेच पण आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पहिल्या दहा विमान कंपन्यांच्या यादीत कंपनीने प्रवेश मिळवला आहे. २०२२ मध्ये कंपनीच्या विमानाद्वारे एकूण ७ कोटी ८० लाख लोकांनी प्रवास केला होता.