Join us

१० शूरवीरांचा सन्मान!, कुटुंबीयांचाही गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 4:45 AM

आपल्या जिवाची पर्वा न करता, देशाच्या सीमेवर लढणाºया जवानांसाठी वरळीच्या ‘अथर्व’ फाउंडेशनने ‘वन फॉर आॅल, आॅल फॉर वन’ हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

मुंबई : आपल्या जिवाची पर्वा न करता, देशाच्या सीमेवर लढणाºया जवानांसाठी वरळीच्या ‘अथर्व’ फाउंडेशनने ‘वन फॉर आॅल, आॅल फॉर वन’ हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाच्या रेजिमेन्ट्समधील आणि बटालियन्समधील १० शूरवीर सैनिकांना कुटुंबीयांसह सन्मानित करण्यात येणार आहे.अथर्व फाउंडेशनचा हा सैनिकांना समर्पित असणाराभव्य-दिव्य कार्यक्रम ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता वरळीतील द नॅशनल स्पोटर््स क्लब आॅफ इंडियाच्या (एनएससीआय) डोम सभागृहात पार पडणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील राणे यांची आहे. या कार्यक्रमाला लेफ्ट. विश्वंभर सिंग, ब्रिगेडिअर एन.डी.जोशी, कॅप्टन बाना सिंग, योगेंद्र सिंग, संजय कुमार, कॅप्टन वरूण सिंग, मेजर रौटेला, मेजर जनरल गजेंद्र प्रसाद, कर्नल आर. एस. चौहान, लेफ्ट. जनरल रवी., ब्रिगेडिअर एन. एस. गिली हे ज्येष्ठ लष्कर अधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील.या कार्यक्रमात मनोरंजन व व्यवसाय क्षेत्रांमधील १० प्रमुख सेलिब्रिटिज कथाकथनाच्या माध्यमातून या १० सैनिकांच्या स्फूर्तिदायी व हृदयद्रावक गाथा मांडणार आहेत. यात प्र्रत्येक सैनिकावरील ध्वनी-चित्रफितीचा समावेशही आहे. त्याचप्रमाणे, या वेळी संपूर्ण सभागृहात देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण होणार आहे.सैनिकच खरे हीरो१० सेलिब्रिटींमध्ये अभिनेत्री हेमामालिनी, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अभिनेत्री शबाना आझमी, ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिलदेव, दिग्दर्शक मधुर भांडारकर अशा दिग्गजांचा समावेश आहे. या अनोख्या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देताना सुनील राणे यांनी सांगितले की, हा कार्यक्रम आजच्या तरुणपिढीत सैन्यदलाविषयी आणि सीमेवर झटणाºया जवानांविषयी जनजागृतीच्या दृष्टीकोनातून आयोजिला आहे. आयुष्यभर झटून समाजाकडून केवळ आदर, सन्मानाची अपेक्षा करणारे हे सैनिकच खरे ‘हीरो’ आहेत.