मध्य रेल्वेवर उद्या १० तासांचा मेगाब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 07:03 AM2018-09-29T07:03:50+5:302018-09-29T07:04:04+5:30
कळवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या डाऊन धिम्या मार्गाच्या कामांसाठी मध्य रेल्वेने रविवारी १० तासांचा ब्लॉक घोषित केला आहे.
मुंबई : कळवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या डाऊन धिम्या मार्गाच्या कामांसाठी मध्य रेल्वेने रविवारी १० तासांचा ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक कालावधीत कळवा आणि मुंब्रा स्थानकांत डाऊन धिम्या मार्गावर लोकल धावणार नाही. रविवारी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांपासून ते संध्याकाळी ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक मुलुंडपासून डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येईल. दिवा स्थानकातून पुन्हा डाऊन मार्गावर या लोकल धावतील.
पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक
रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसा ब्लॉक नसल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना काहीअंशी दिलासा मिळणार आहे. तथापि शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री पश्चिम रेल्वे वसई रोड आणि भार्इंदर स्थानकांदरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेणार आहे. शनिवार रात्री १२ वाजून ३० मिनिटे ते रविवारी पहाटे ४ वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी घेण्यात येणाऱ्या या विशेष रात्रकालीन ब्लॉकबाबत सविस्तर माहिती पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांतून घोषणेद्वारे देण्यात येत आहे
कुर्ला-वाशी मार्गावरून लोकल नाही
हार्बर मार्गावर सकाळी ११ वाजून १० मिनिटे ते दुपारी ४ वाजून १० मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असेल. या काळात कुर्ला-वाशी या अप तसेच डाऊन मार्गावर एकही लोकल धावणार नाही. प्रवाशांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि कुर्ला-वाशी /पनवेल मार्गावर विशेष लोकल फे ºया चालविण्यात येतील.