मध्य रेल्वेवर रविवारी 10 तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक

By admin | Published: September 16, 2016 09:29 PM2016-09-16T21:29:24+5:302016-09-16T23:12:02+5:30

दिवा स्थानकात असणा-या डाऊन लोकल लाईनच्या कट-कनेक्शन कामांसाठी १८ सप्टेंबर रोजी दहा तासांचा ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक मध्य रेल्वेकडून घेण्यात येणार आहे.

10 hours special traffic block on the Central Railway on Sunday | मध्य रेल्वेवर रविवारी 10 तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक

मध्य रेल्वेवर रविवारी 10 तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक

Next
dir="ltr">ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि.16 - दिवा स्थानकात असणा-या डाऊन लोकल लाईनच्या कट-कनेक्शन कामांसाठी १८ सप्टेंबर रोजी दहा तासांचा ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक मध्य रेल्वेकडून घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी साडे आठ ते सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत असेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. या कामामुळे सीएसटी ते कल्याणपर्यंत नविन जलद लाईन उपलब्ध होणार आहे. ब्लॉकमुळे लोकल सेवांवर मोठा परिणाम होणार असून दहा मेल-एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे जादा जवान तैनात केले जाणार आहेत.
दिवा स्थानकात घेण्यात येणाºया या कामामुळे मुलुंड ते कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. त्यामुळे ठाणे, दिवा (नविन प्लॅटफॉर्म)आणि डोंबिवली स्थानकात लोकल गाड्यांना थांबा मिळेल. तर कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकात लोकल थांबणार नाहीत. यामध्ये ठाणे ते आसनगाव ७.५९ वाजताची लोकल, मुलुंड ते कल्याण ८.0२ वा, ८.१४ वा, ९.0२ वा, ९.२२ वा, १७.५२ वा आणि १८.0२ वाजताच्या लोकल, मुलुंडहून ८.३0 वाजता सुटणारी आसनगाव लोकल, मुलुंडहून सुटणारी १७.१३ वाजताची टिटवाळा लोकल आणि ठाण्याहून १७.३२ वाजता सुटणाºया कसारा लोकलचा समावेश आहे.
मुंब्रा स्थानकातून सुटणाºया सर्व धीम्या लोकल या ९.३७ ते १७.१८ या कालावधीत डाऊन जलद मार्गावर दिवा ते कल्याण दरम्यान धावतील. त्यांना दिवा (नविन प्लॅटफॉर्म) आणि डोंबिवली स्थानकात थांबा देण्यात येईल. संपूर्ण ब्लॉक काळात कोपर आणि ठाकुर्ली स्थानकात डाऊन धीम्या लोकल गाड्यांना थांबा देण्यात येणार नसल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. या स्थानकात येण्यासाठी प्रवाशांना व्हाया कल्याण आणि डोंबिवलीमार्गे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
..................................

- डाऊन धीम्या लोकल सकाळी ८.00 ते सकाळी ९.३0 पर्यंत तर संध्याकाळी १७.३0 ते १९.00 या वेळेत कळवा आणि मुंब्रा स्थानकात थांबणार नाहीत.
-  या स्थानकातील प्रवाशांना व्हाया दिवा आणि ठाणे स्थानकमार्गे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
- सकाळी ९.३0 ते संध्याकाळी १७.१५ या वेळेत लोकलच्या फेºया दर १५ मिनिटांनी होतील.
....................

अतिरिक्त थांबा
- सीएसटीहून सुटणाºया जलद लोकलना सकाळी ७.५३ ते संध्याकाळी १७.४१ या वेळेत दिवा स्थानकातील नविन प्लॅटफॉर्मवर थांबा देण्यात येईल.
- सीएसटीकडे येणाºया आणि सीएसटीहून सुटणाºया सर्व धीम्या, जलद लोकल या १५ ते २0 मिनिटे उशिराने धावतील.
- सीएसटी ते कुर्ला, ठाणे दरम्यान विशेष लोकल चालविल्या जातील.
.................
पुढीलप्रमाणे मेल-एक्सप्रेस आणि पॅसेंजर ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.
- मुंबईतून सुटणारी ट्रेन नंबर ११0२९ कोयना एक्सप्रेस.
- मुंबईत येणारी ट्रेन नंबर ११0१0 सिंहगड एक्सप्रेस.
-मुंबईतून सुटणारी ट्रेन नंबर ११00९ सिंहगड एक्सप्रेस.
- मुंबईत येणारी ट्रेन नंबर १२१२६ प्रगती एक्सप्रेस
- मुंबईतून सुटणारी ट्रेन नंबर १२१२५ प्रगती एक्सप्रेस
- एलटीटीला पोहोचणारी ट्रेन नंबर १२११८ गोदावरी एक्सप्रेस.
- एलटीटीहून सुटणारी ट्रेन नंबर १२११९ गोदावरी एक्सप्रेस
- दादरला पोहोचणारी ट्रेन नंबर ५0१0४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर.
- दादरहून सुटणारी ट्रेन नंबर ५0१0३ दादर-रत्नागिरी ट्रेन.
....................
१७ सप्टेंबर रोजी मुंबईत येणारी ट्रेन नंबर ११0३0 कोयना एक्सप्रेसही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
...........
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याने प्रवाशांना निदान हार्बरची तरी सेवा मिळावी यासाठी रविवारी हार्बरवर ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले.
.....................

महत्वाचे
- कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर,ठाकुर्ली स्थानकासह ठाणे व कल्याण, डोंबिवली स्थानकात मोठ्या प्रमाणात रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात केले जाणार आहेत.
- मध्य रेल्वेकडून सहा बसेस भाड्याने घेण्यात आल्या असून त्या ठाकुर्ली ते कोपर दरम्यान चालविण्यात येणार आहेत.
- प्रत्येक रविवारी होणाºया ब्लॉक काळात ३0 टक्के लोकल फेºया कमी चालविल्या जातात. यंदाच्या रविवारी ३0 टक्के फेºया कमी चालवताना आणखी १00 फे-या कमी चालवल्या जाणार आहेत.
..............................
दर पंधरा दिवसांनी आणखी तीन ब्लॉक
येत्या रविवारी दहा तासांचा ब्लॉक घेतल्यानंतर आणखी तीन मोठे ब्लॉक दर पंधरा दिवसांनी घेण्याचे नियोजन केले आहे. हे ब्लॉकही साधारपणे आठ ते दहा तासांचेच असतील.
.......................

प.रेवर शनिवारी नाईट ब्लॉक
देखभाल व दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेवर १७ सप्टेंबर रोजी रात्री १२ ते मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत वसई रोड ते विरार दरम्यान अप जलद मार्गावर तर १.२0 ते ३.५0 पर्यंत डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
.....................

Web Title: 10 hours special traffic block on the Central Railway on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.