Join us

सुशोभिकरणात दहा लाखांचा भ्रष्टाचार

By admin | Published: May 25, 2015 10:48 PM

महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून सम्राट अशोक चौक सुशोभिकरणाच्या माध्यमातून १० लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आहे.

कल्याण : कल्याण पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक १७ ठाणकर पाडा येथील महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून सम्राट अशोक चौक सुशोभिकरणाच्या माध्यमातून १० लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आहे. या विकासकामात चौकाचे सुशोभिकरण कागदोपत्रीच झाले असून याकामाचे बिल ठेकेदारला अदा करण्याचा प्रताप महापालिकेच्या बांधकाम विभागाने स्थानिक नगरसेवक आणि काहींंच्या आशीवार्दाने केल्याचाआरोप आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे. यासंदर्भातत्यांनी आयुक्तांकडे चौकशी करुन दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.कल्याण ठाणकर पाडा परिसरातील महापालिकेच्या रमाबाई आंबेडकर उद्यान नजीक सम्राट अशोक चौक आहे. हे काम मे. रामकृष्ण मजूर कामगार सहकारी संस्थेने पूर्ण केले असून संबंधित संस्थेला बिलाची रक्कम अदा करण्यात आली आहे. सदरचे काम फक्त कागदावरच झाले असून प्रत्यक्षात याठिकाणी हा चौक अद्याप विकसित करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर या विकासकामातील तांत्रिक मान्यतेत चौक सुशोभीकरणासाठी लागण्याऱ्या कोणत्याच कामाचा उल्लेख नसून गटार पायवाटाच्या कामाला चौक सुशोभिकरणाच्या नावाखाली मान्यता देण्यात आली आहे.दरम्यान या चौकाच्या सुशोभिकरणाच्या माध्यमातून महापालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी, स्थानिक नगरसेवक आणि तत्सम व्यक्तींच्या आशीवार्दाने हा लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट होत आहे. या चौकशीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक १७ ठाणकर पाडा येथे गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. यामाध्यमातून मोठ्या प्रमाणात झालेल्या अनागोंदी कारभाराची आणि भ्रष्टाचाराची आपण विशेष समितीच्या माध्यमातून निपक्षपणे उच्चस्तरीय चौकशी करावी. त्यात कोणी दोषी आढळल्यास याबाबात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून नागरीसुविधांच्या विकास निधीत भ्रष्टाचारा करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दखल करावे असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.आयुक्तांनी या मुद्यांच्या आधारे करावी चौकशी प्रभाग क्रमांक १७ ठाणकर पाडा - सन २०१० ते २०१५ झालेली विकासकामे, राज्यसभा लोकसभा खासदार निधीतून विकासकामे, विधानसभा विधानपरिषद आमदार निधीतून विकासकामे नगरसेवक निधीतून विकासकामे, महापलिकेच्या आर्थिक अंदाज पत्रकातील विशेष तरतूदील विकासकामे, महापलिकेच्या स्थायी समितीच्या विशेष तरतूदील विकासकामे मे. रामकृष्ण मजूर कामगार सहकारी संस्थेच्या माध्यमातून पालिका क्षेत्रात करण्यात आलेली विकासकामे , तरी याबाबत आपण तातडीने सदरची चौकशी पूर्ण करून सदरचा अहवाल पवार यांनाही हवा असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.ते लोकप्रतिनिधी/ महापालिकेचे अधिकारी कोण? या भ्रष्टाचार झाल्याच्या शक्यतेबाबत पवार यांच्या निशाण्यावर महापालिकेचे नेमके कोणते अधिकारी आहेत, कोणत्या लोकप्रतिनिधींवर त्यांची संशय वाटत आहे याबाबतचे स्पष्टीकरण मात्र त्यांच्या पत्रातून होऊ शकलेले नाही. त्या संदर्भात त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या भ्रमणध्वनी बंद येत होता.