Corona Vaccination: दुसऱ्या डोसवाल्यांना मुदत आली आडवी..! मुंबईत १० टक्के नागरिकांचा खोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 07:06 AM2022-01-09T07:06:26+5:302022-01-09T07:10:19+5:30
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत महापालिकेने १०८ टक्के नागरिकांना पहिला डोस दिला. यामध्ये मुंबईबाहेरील लोकांचाही समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविड प्रतिबंधक लसींचा मुबलक साठा सध्या महापालिका आणि खासगी रुग्णालयात उपलब्ध आहे. मात्र दुसऱ्या डोससाठी पात्र नागरिकांची अद्याप ८४ दिवसांची मुदत पूर्ण झाली नाही. त्यामुळे उर्वरित दहा टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी महापालिकेला ही मुदत संपण्याची प्रतीक्षा आहे.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत महापालिकेने १०८ टक्के नागरिकांना पहिला डोस दिला. यामध्ये मुंबईबाहेरील लोकांचाही समावेश आहे. तर ९० टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. मागील काही दिवसांमध्ये मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लसीकरण पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. २६ जानेवारीपर्यंत मुंबईतील लसीकरण पूर्ण करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे. त्यानुसार लसीपासून वंचित नागरिकांना शोधण्याची मोहीमदेखील फिरत्या वाहनांच्या माध्यमातून सुरू आहे. तर दुसरा डोस चुकविणाऱ्या नागरिकांचाही शोध घेण्यात आला. तसेच डोसचा अतिरिक्त साठा ठेवण्यात आला आहे. मात्र बहुतांश नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात आल्याने ८४ दिवसांनंतरच त्यांना दुसरा डोस देता येणार आहे. त्यामुळे या दहा टक्के लाभार्थ्यांची ही मुदत संपल्यानंतर त्यांना लस देणे शक्य होणार आहे.
१५ ते १८ वयोगटासाठी लसीकरण केंद्र
१५ ते १८ वयोगटातील नऊ लाख मुलांचे लसीकरण ३ जानेवारीपासून सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत ५० हजार ६१८ मुलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सध्या मुंबईतील नऊ केंद्रात ही लसीकरण मोहीम सुरू आहे. पालिकेकडे सध्या तीन लाख कोवॅक्सिन लसीचा साठा आहे. त्यामुळे सोमवारपासून दोनशे लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
महापालिकेकडे सात लाख तर खासगी रुग्णालयांमध्ये १४ लाख डोस शिल्लक आहेत. मात्र ८४ दिवसांची मुदत संपल्यानंतर उर्वरित दहा टक्के लोकांना लस देता येणार आहे.
- इकबाल सिंह चहल, आयुक्त, मुंबई महापालिका
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. तसेच कोरोनाबाधित रुग्ण नॉन-कोरोना खासगी रुग्णालयात आल्यास त्याला प्रथम दाखल करून त्याची प्रकृती स्थिर करून मगच इतर रुग्णालयात हलवावे. - एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री
राज्यात
१३३ ओमायक्रॉन बाधित; एकूण संख्या हजारपार
nराज्यात शनिवारी १३३ ओमायक्रॉन संसर्ग असणाऱ्या रुग्णांचे निदान झाले आहे. यापैकी १३० रुग्णांचे भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने आणि ३ रुग्णांचे गुजरात राज्याने निदान केले आहे.
nदिवसभरात नोंद झालेल्या १३३ रुग्णांमध्ये पुणे मनपा ११८, पिंपरी -चिंचवड ८, पुणे ग्रामीण ३, वसई विरार-२, अहमदनगर आणि मुंबई प्रत्येकी १, आदी रुग्णांचा समावेश आहे.
nक्षेत्रीय सर्वेक्षणातून ३०७६ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीस पाठविले आहेत. यापैकी ९७ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.
नियम माेडल्यास भरा जबर दंड
कोविड नियमांचे भंग केल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी, प्रवासात मास्क वापरणे आणि कोविड प्रतिबंधक व्यवहार बंधनकारक असणार आहे. लोकल ट्रेन, मेट्रो, मोनो, बस, टॅक्सी-रिक्षात मास्क बंधनकारक आहे. मास्क नसल्यास ५०० रुपये दंड. खासगी वाहनात एकाच कुटुंबातील व्यक्ती नसतील तर मास्क लावणे आवश्यक.
nएखाद्या संस्थेत, आस्थापनेत कोविड नियम तोडणाऱ्यांना वैयक्तिक दंड. तर, सदर आस्थापनेला १० हजारांचा दंड.
nसंस्था, आस्थापनेकडून मार्गदर्शक सूचनांचा भंग झाल्यास ५० हजारांचा दंड
nटॅक्सीसह अन्य वाहतुकीच्या वाहनात कोविड नियमांचे पालन होत नसल्यास संबंधित प्रवासी आणि वाहन चालक, कंडक्टरला ५०० रुपये दंड. तर, बसमध्ये नियमांचे पालन न झाल्यास ट्रान्स्पोर्ट एजन्सीला
१०,०००
रुपयांचा दंड.
nसंस्था, आस्थापनांनी त्यांच्यासाठी असलेल्या मार्गदर्शक सूचनांचा भंग केल्यास ५० हजारांचा दंड
nसातत्याने नियमभंग होत असल्यास कायद्यानुसार अटकेची कारवाई.