मुंबई : मलबार हिल जलाशय पुनर्बांधणीसंदर्भात तज्ज्ञ समिती १८ डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील पाहणी करणार असल्याने जलाशयाचा कप्पा रिक्त करावा लागणार आहे. त्यामुळे शहर विभागात काही परिसरात पाणीकपात केली जाणार आहे.
त्यामुळे ए, सी, डी, जी उत्तर, जी दक्षिण विभागातील नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. १८ डिसेंबर रोजी सकाळी ८:०० ते सकाळी १०:०० वाजेपर्यंत तज्ज्ञ समिती जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार आहे.
पाणीपुरवठ्यावर परिणाम -
ए विभाग: मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘’ए’’ विभागातील सर्व क्षेत्र - पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात.
सी विभाग : मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘’सी’’ विभागातील सर्व क्षेत्र पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात.
डी विभाग : मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘’डी’’ विभागातील सर्व क्षेत्र. पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात.
जी दक्षिण व जी उत्तर विभाग:
जी दक्षिण व जी उत्तर विभागातील थेट पाणीपुरवठा होणारे सर्व विभाग, पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात. या विभागात पाणीपुरवठ्यात कपात होईल.