Join us  

विद्यापीठाच्या परीक्षा शुल्कात १० टक्के कपात, अकॅडमिक कौन्सिलने दिली मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 1:54 AM

मुंबई विद्यापीठाने आॅनलाइन मूल्यांकनासाठी वाढविलेल्या परीक्षा शुल्कामध्ये अखेर १० टक्के कपातीचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या अकॅडमिक कौन्सिलने बुधवारी या निर्णयाला मंजुरी दिली आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाने आॅनलाइन मूल्यांकनासाठी वाढविलेल्या परीक्षा शुल्कामध्ये अखेर १० टक्के कपातीचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या अकॅडमिक कौन्सिलने बुधवारी या निर्णयाला मंजुरी दिली आहे.विद्यापीठाच्या शुल्क आकारण्याच्या पद्धतीतही विविध बदल करण्याचा निर्णय कौन्सिलने घेतल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी या संदर्भातील अधिकृत घोषणा केली जाईल. या आधी विद्यापीठाने आॅनलाइन मूल्यांकन सुरू केल्याचे कारण देत, परीक्षा शुल्कात वाढ केली होती. मात्र, मूल्यांकनात झालेला गोंधळ आणि विद्यार्थी संघटनांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर, शुल्कात कपात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून ही कपात लागू होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ