१०० कोरोनाबाधित रुग्णालयांत दाखल, मुंबईत २०७ रुग्णांची भर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 06:23 AM2023-04-09T06:23:55+5:302023-04-09T06:24:14+5:30

शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. शनिवारी २०७ नवीन कोरोनाबाधितांचे निदान झाले.

100 corona patients admitted to hospitals 207 patients added to Mumbai | १०० कोरोनाबाधित रुग्णालयांत दाखल, मुंबईत २०७ रुग्णांची भर

१०० कोरोनाबाधित रुग्णालयांत दाखल, मुंबईत २०७ रुग्णांची भर

googlenewsNext

मुंबई :

शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. शनिवारी २०७ नवीन कोरोनाबाधितांचे निदान झाले. सद्य:स्थितीत १०० बाधित शहरातील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. त्यापैकी ४६ रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. शहरात सध्या कोरोनाचे १,३८५ सक्रिय रुग्ण आहेत. 

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यभरात ५४२  नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. त्यात अमरावती महापालिकेच्या हद्दीतील एका कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली. सद्य:स्थितीत राज्यात कोरोनाचे एकूण ४,३६० सक्रिय रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार २४ डिसेंबर २०२२ पासून राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. शनिवार सकाळपर्यंत विमानतळावर १७,४३,३४९ प्रवासी आले. त्यापैकी ३९ हजार ९०८ प्रवाशांचे आरटीपीसीआर करण्यात आले. 

प्रिकॉशनरी डोसकडे वाढू लागला कल 
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने  राज्यात प्रिकॉशनरी डोस घेणाऱ्याची संख्या वाढत आहे. शनिवारी राज्यात एकूण ७२ लसीकरण सत्रे घेण्यात आली. त्यात ३३५ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये पहिला डोस, दुसरा डोस आणि प्रिकॉशनरी डोस  घेणाऱ्याची संख्या आहे. यामध्ये विशेष म्हणजे प्रिकॉशनरी डोस  घेणाऱ्याची संख्या सर्वाधिक असून, १५९ इतकी आहे. 

राज्यभराची आकडेवारी
५४२ नवीन रुग्ण
६६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले  
४,३६० एकूण सक्रिय रुग्ण 
१.८२% राज्यातील मृत्यूदर

Web Title: 100 corona patients admitted to hospitals 207 patients added to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.