लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महापालिकेने तब्बल सात वर्षांनंतर हँकॉक पूल खुला केल्याने माझगाव आणि डोंगरी ही दोन ठिकाणे पुन्हा एकदा जोडली गेली आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांसह वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे.
हँकॉक पूल २०१६ मध्ये मध्य रेल्वेने तोडला.पुलाच्या पुनर्बांधणीचे काम महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. पुलाच्या बांधणीतील पहिल्या टप्प्यात पहिला गर्डर जुलै २०२० मध्ये स्थापन करण्यात आला. पदपथ जानेवारी २०२१ मध्ये सर्वसामान्यांच्या वापरासाठी खुला करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यातील सुमारे ६७५ मेट्रिक टन वजनाच्या गर्डरचे काम ६ जून रोजी पूर्ण करण्यात आले. हा पूल लवकर खुला करण्यात यावा यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य सचिव समीर शिरवाडकर यांनी सातत्याने प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला होता.
१०० कोटींचा खर्चखर्च : सुरुवातीला पूल बांधण्यासाठी १४ कोटी खर्च होणार होते. मात्र, विलंबामुळे खर्च १०० कोटींवर पोहोचला.
१८९७ साली ब्रिटिशांनी हा पूल बांधला होता.धोकादायक स्थितीत असल्याने २०१५ साली पूल बंद करण्यात आला.
२०१६ साली पूल तोडला.
२०१८ साली पुलाचे काम सुरू झाले.
पुलाचे काम पूर्ण होण्यास ३ वर्षे लागली.