सलमानचा चॅनेलविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
By admin | Published: October 8, 2016 11:58 AM2016-10-08T11:58:21+5:302016-10-08T12:20:47+5:30
अभिनेता सलमान खानने मुंबई हायकोर्टात एका टीव्ही चॅनेलवर 100 कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे.
Next
लोकमत ऑनलाइन
मुंबई, दि. 8 - अभिनेता सलमान खानने मुंबई हायकोर्टात एका टीव्ही चॅनेलवर 100 कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. 1998 साली 'हम साथ साथ है' सिनेमाच्या शुटिंगवेळी जोधपूरमध्ये काळवीटाची शिकार केल्याचा आरोप सलमानवर आहे. काळवीट शिकारप्रकरणी संबंधित चॅनेलने माझ्याविरोधात स्टिंग ऑपरेशन केले आहे, असा दावा सलमान खानने केला आहे. हे स्टिंग ऑपरेशन रागाच्या भावानेने आणि बदनामी करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचा दावाही सलमानने केला आहे. त्यामुळे हे स्टिंग ऑपरेशन प्रसिद्ध केले जाऊ नये,अशी मागणी सलमानने केली आहे.
दरम्यान, या स्टिंग ऑपरेशनमध्ये, साक्षीदाराने सलमानला काळवीटाची शिकार करताना पाहिल्याचे सांगितले, पण नंतर साक्षीदाराने आपली साक्ष बदलत, व्हिडिओमध्ये छेडछाड केल्याचे म्हटले, असा दावा अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात आलेल्या चॅनेलने केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी 18 नोव्हेंबरला होणार आहे. याप्रकरणी कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.