मुंबई : कांदिवलीत १०० दात्यांनी रक्तदान करत समाजाशी ‘रक्ताचे नाते’ जपण्याचा प्रयत्न केला. लोकमत, राजस्थानी सेवा समिती आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी हे शिबिर पार पडले.
जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ने ‘रक्ताचं नातं’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. विविध संस्था आणि संघटनांच्या सहकार्याने राज्यभरात रक्तदानाचा महायज्ञ अखंड सुरू आहे. रविवारी कांदिवली पूर्वेकडील ठाकूर व्हिलेज परिसरात राजस्थानी सेवा समिती आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई १०१च्या सहकार्याने पार पडलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी शिबिराला उपस्थिती दर्शवत ‘लोकमत’च्या उपक्रमाचे कौतुक केले. कोरोनाकाळात राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यावर मात करण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला आहे. बाबूजींना ही खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल. आम्हाला या माध्यमातून ‘लोकमत’च्या उपक्रमाला हातभार लावता आला, याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी व्यक्त केली.
यावेळी राजस्थानी सेवा समिती, कांदिवली पूर्वचे अध्यक्ष महेशचंद्र गुप्ता, उपाध्यक्ष नारायण गोयनका, शामसुंदर धनुका, ताराचंद कुमावत, मनोज शर्मा, कपूर चंद जैन, राधे श्याम साबू उपस्थित होते. त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ मुंबई १०१चे अध्यक्ष संजय बोहरा, उपाध्यक्ष राजेश अग्रवाल, भवानी नंदवाना, लालचंद मेवाडा, आशिष वाकलीवाल, मोनिका जैन, सुरभी जैन यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
फोटो ओळ : उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी रक्तदान शिबिराला उपस्थित राहून ‘लोकमत’च्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी राजस्थानी सेवा समिती, कांदिवली पूर्व आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई १०१चे पदाधिकारी उपस्थित होते.