डिझेल वाचविण्यासाठी राज्यात धावणार १०० इलेक्ट्रिक बस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 05:45 AM2021-03-30T05:45:17+5:302021-03-30T05:58:40+5:30

डिझेलचा वाढता खर्च कमी करण्यासाठी आणि एसटीला फायद्यात आणण्यासोबतच प्रवाशांना चांगली सुविधा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यभरातील विविध मार्गांवर १०० इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात येणार आहेत.

100 electric buses to run in the state to save diesel | डिझेल वाचविण्यासाठी राज्यात धावणार १०० इलेक्ट्रिक बस

डिझेल वाचविण्यासाठी राज्यात धावणार १०० इलेक्ट्रिक बस

googlenewsNext

सोलापूर : डिझेलचा वाढता खर्च कमी करण्यासाठी आणि एसटीला फायद्यात आणण्यासोबतच प्रवाशांना चांगली सुविधा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यभरातील विविध मार्गांवर १०० इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये सोलापुरातून दोन मार्गांवर इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी एसटी महामंडळाने नुकतेच टेंडर मागविले आहे. (100 electric buses to run in the state to save diesel)
सोलापूर येथून सोलापूर-पुणे या अडीचशे किलोमीटर मार्गावर १० बसेस आणि सोलापूर-विजापूर- सोलापूर या मार्गावर पाच बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. या दोन्ही मार्गांसह राज्यातील अन्य १७ विभागांतून इलेक्ट्रिक बस सोडण्यात येणार आहेत.

या मार्गांवरही धावणार 
औरंगाबाद-पुणे, पुणे-नाशिक, कोल्हापूर-पुणे, सोलापूर-पुणे, पुणे-महाबळेश्वर, पुणे-सातारा, कोल्हापूर-बेळगाव, सोलापूर-विजापूर, औरंगाबाद-नांदेड, औरंगाबाद-शिर्डी, नागपूर-भंडारा, नाशिक-शिर्डी या मार्गांवर १०० इलेक्ट्रिक बसेस सोडण्यात येणार आहेत. यासाठी टेंडर मागविण्यात आलेले आहे. 

सात ठिकाणी चार्जिंग व्यवस्था
राज्यात विविध मार्गांवर १०० इलेक्ट्रिक गाड्यांचे नियोजन महामंडळाने केले आहे. या गाड्यांच्या चार्जिंगसाठी ७ ठिकाणी चार्जिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. यात पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, नांदेड या ठिकाणी ही व्यवस्था केली जाणार आहे.

Web Title: 100 electric buses to run in the state to save diesel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.