राज्यात उभारणार १०० आंतरराष्ट्रीय शाळा - शिक्षण मंत्री विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 01:46 AM2017-11-04T01:46:27+5:302017-11-04T01:46:47+5:30

माध्यमिक शिक्षणातील मुलींच्या गळतीचे प्रमाण ५ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी तसेच शैक्षणिक कामगिरीत राज्यास देशात प्रथम तीन क्रमांकांमध्ये आणण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या १०० शाळांची निर्मिती करण्यात येणार आहे.

100 international schools to be set up in the state - Education Minister Vinod Tawde | राज्यात उभारणार १०० आंतरराष्ट्रीय शाळा - शिक्षण मंत्री विनोद तावडे

राज्यात उभारणार १०० आंतरराष्ट्रीय शाळा - शिक्षण मंत्री विनोद तावडे

Next

मुंबई : माध्यमिक शिक्षणातील मुलींच्या गळतीचे प्रमाण ५ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी तसेच शैक्षणिक कामगिरीत राज्यास देशात प्रथम तीन क्रमांकांमध्ये आणण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या १०० शाळांची निर्मिती करण्यात येणार आहे.
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज ही माहिती दिली. हा पथदर्शी प्रकल्प असेल.आहेत त्याच शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याची ही योजना आहे.
आंतरराष्ट्रीय करण्यासाठी शाळांकडून आलेल्या अजार्तून शाळांच्या निवडीसाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन करण्यात येणार असून या समितीमध्ये
विद्या प्राधिकरण, प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण संचालक तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष यांचा सदस्य म्हणून समावेश असेल.

Web Title: 100 international schools to be set up in the state - Education Minister Vinod Tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा