Join us

राज्यात उभारणार १०० आंतरराष्ट्रीय शाळा - शिक्षण मंत्री विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 1:46 AM

माध्यमिक शिक्षणातील मुलींच्या गळतीचे प्रमाण ५ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी तसेच शैक्षणिक कामगिरीत राज्यास देशात प्रथम तीन क्रमांकांमध्ये आणण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या १०० शाळांची निर्मिती करण्यात येणार आहे.

मुंबई : माध्यमिक शिक्षणातील मुलींच्या गळतीचे प्रमाण ५ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी तसेच शैक्षणिक कामगिरीत राज्यास देशात प्रथम तीन क्रमांकांमध्ये आणण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या १०० शाळांची निर्मिती करण्यात येणार आहे.शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज ही माहिती दिली. हा पथदर्शी प्रकल्प असेल.आहेत त्याच शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याची ही योजना आहे.आंतरराष्ट्रीय करण्यासाठी शाळांकडून आलेल्या अजार्तून शाळांच्या निवडीसाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन करण्यात येणार असून या समितीमध्येविद्या प्राधिकरण, प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण संचालक तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष यांचा सदस्य म्हणून समावेश असेल.

टॅग्स :शाळा