प्रदूषण कमी करण्यासाठी जगभरातील १०० महापौर उतरले मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:05 AM2021-06-05T04:05:56+5:302021-06-05T04:05:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सी ४० नेटवर्कद्वारे १०० महापौर एकत्र आले असून, आता ते जागतिक उष्णतेला १.५ डिग्री ...

100 mayors from around the world take to the field to reduce pollution | प्रदूषण कमी करण्यासाठी जगभरातील १०० महापौर उतरले मैदानात

प्रदूषण कमी करण्यासाठी जगभरातील १०० महापौर उतरले मैदानात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सी ४० नेटवर्कद्वारे १०० महापौर एकत्र आले असून, आता ते जागतिक उष्णतेला १.५ डिग्री सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी काम करत आहेत. सध्या जगातील ९७ देश सी ४० चा एक भाग आहेत. या शहरांमध्ये पॅरिस कराराच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी काम सुरू आहे.

सी ४० चे सदस्य होणारे मुंबई हे सहावे भारतीय शहर आहे. हवामान बदलांशी झुंज देण्याच्या दृष्टीने मुंबईने उचललेले हे फार मोठे तसेच अत्यंत आवश्यक पाऊल आहे. विकासकांनी प्रदेश विस्तृत करण्याच्या असंख्य प्रयत्नात समुद्रकिनारे नष्ट केले, खारफुटीचे नुकसान केले, नद्या अडकून पडल्या आणि जलसाठा जप्त केला. विविध अभ्यासानुसार, मानवाच्या अशा हस्तक्षेपामुळे झालेल्या हवामान बदलांमुळे २०५० पर्यंत मुंबईच्या अनके भागांत पूर येऊ शकतो. हवामान बदलामुळे धोक्यात आलेल्या शहरांच्या यादीत मुंबईचा समावेश आहे. अवकाळी, मुसळधार पाऊस, चक्रीवादळ, ग्लोबल वार्मिंग असे अनेक दुष्परिणाम भाेगावे लागणार आहेत.

मुंबईच्या किनाऱ्यावरील पाणी गरम होत आहे. वाढत्या प्रमाणात प्रदूषित होत आहेत. घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनाअभावी शहरातील नद्या दुर्गंधीयुक्त झाल्या आहेत. अतिवृष्टी आणि वादळाचा धोका आहे. ऑकलँड, बर्लिन, लिमा, रोम, पॅरिस आणि मेक्सिको सिटी यासह अनेक सी ४० शहरांमध्ये साथीच्या रोगांनी डाेके वर काढले आहे. प्रदूषण वाढत आहे. याविरुद्ध आता जगभरातील १०० महापौर मैदानात उतरले आहेत.

सी ४० शहर म्हणून मुंबईत भविष्यातील घडामोडींचा सक्रियपणे विचार करण्याची क्षमता निर्माण हाेईल. शहरांना उत्सर्जन कमी होण्यास मदत हाेईल. जागतिक तापमानवाढीचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक विविध उपाययोजनांच्या अंमलबजावणीमध्ये क्षेत्रीय शासनाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल.

* ‘माझी वसुंधरा’द्वारे प्रयत्न सुरू

सी ४० शहरांव्यतिरिक्त आपले माझी वसुंधरा नावाचे महाराष्ट्र व्यापी हवामान धोरण आहे. पर्यावरण व हवामान बदल विभाग, शासन महाराष्ट्रातील, शाश्वत विकास आणि हवामान बदलांविषयी संवेदनशील करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि वयोगटातील लाेकांना सहभागी करून घेणे याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

.........................................

Web Title: 100 mayors from around the world take to the field to reduce pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.