१०० गिरणी कामगारांना मिळणार घरांच्या चाव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 07:17 AM2023-06-12T07:17:16+5:302023-06-12T07:17:39+5:30
कोरोना संसर्गामुळे गिरणी कामगारांना घरे देण्याच्या २०२०च्या सोडतीमध्ये घरे देण्यास झाला विलंब
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कोरोना संसर्गामुळे गिरणी कामगारांना घरे देण्याच्या २०२० च्या सोडतीमध्ये बॉम्बे डाइंग आणि श्रीनिवास मिलमधील कामगारांना घरे देण्यास विलंब झाला. मात्र, आता पात्र गिरणी कामगारांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार असून, १०० गिरणी कामगारांना घरांचा ताबा देण्याची तयारी म्हाडाकडून सुरू करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात या कामगारांना चाव्या देण्यात येतील, असे गिरणी कामगार सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे यांनी सांगितले.
३ हजार ८९४ घरांची लॉटरी काढण्यात आली. यात गिरणी कामगारांनी कागदपत्रांची पूर्तताही केली, ते पात्रही झाले होते; परंतु एकालाही घर मिळाले नाही. त्यांना मुद्रांक शुल्क आणि देखभाल या संबंधात पत्रे पाठवण्यात आली नव्हती. दरम्यान आता ६०० देकार पत्र तयार करून ती पत्रे पोहोचविण्याचे काम सुरू आहे. तसेच यामधील ७० जणांनी कागदपत्रांची पूर्तताही केली आहे. त्याचप्रमाणे १०० जणांची
ताबा देण्याची तयारी पूर्ण झाली आहे.
संनियंत्रण समिती
गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सरकारने गिरणी कामगार सनियंत्रण समिती स्थापन केली असून, समितीच्या बैठकीत कामगारांना घरे देण्याबाबत चर्चा केली जात आहे.