कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गावरील भुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण

By सचिन लुंगसे | Published: November 30, 2022 07:13 PM2022-11-30T19:13:57+5:302022-11-30T19:14:34+5:30

मुंबई सेंट्रल स्थानकात भुयारीकरणाचा अंतिम टप्पा पार पडला, मुंबई मेट्रो-३ या प्रकल्पाचे एकूण ७६.६% काम पूर्ण झाले आहे

100 percent completion of subway work on Colaba-Bandre-Seepz Metro 3 line | कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गावरील भुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गावरील भुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण

googlenewsNext

मुंबई - मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (मुं.मे.रे.कॉ.) च्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानकावर आज ४२ वा व प्रकल्पातील अंतिम भुयारीकरणाचा टप्पा पार पडला. अपलाईन मार्गावरील वरील या भुयारीकरणास एकूण ४३ दिवसांचा कालावधी लागला. यामध्ये ५५८ काँक्रीट रिंग्सचा वापर करण्यात आला. 

मेट्रो-३ मार्गातील सर्वात लांब पट्ट्यांपैकी एक असलेल्या पॅकेज-३ मध्ये मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक आणि वरळी या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. पॅकेज-३ अंतर्गत महालक्ष्मी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकापर्यंतची ८३७ मीटरची सर्वात आव्हानात्मक भुयारीकरणाचे काम रॉबिन्सच्या टीबीएम तानसा-१ ने यशस्वीरित्या पूर्ण केले. 

आज मेट्रो-३ च्या भुयारी मार्गाचे काम १००% पूर्ण झाले या क्षणाचे साक्षीदार होताना याचा मला अतिशय आनंद होत आहे. हा मार्ग मुंबईच्या ऐतिहासिक वारसा इमारती, जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारती, सध्याचा मेट्रो मार्ग, रेल्वे मार्ग, नदी व कठीण भौगोलिक रचना असलेला परिसर आदींच्या खालून व अगदी जवळून जात असल्याने मेट्रो-३ साठी भुयारीकरण करणे खूपच आव्हानात्मक होते, असे मत मुं.मे.रे.कॉ.च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी व्यक्त केले.

आम्ही कामगारांच्या सुरक्षिततेशी तडजोड न करता आधुनिक तंत्रज्ञान वापरले.  प्रकल्प सल्लागार कंत्राटदार  मुं.मे.रे.कॉ. च्या संपूर्ण टीमसाठी हे एक जिकिरीचे काम होते. मेट्रो-३ हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईकरांना जलद, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल, असे मत मुं.मे.रे.कॉ.चे संचालक (प्रकल्प) एस.के. गुप्ता यांनी व्यक्त केले.

Web Title: 100 percent completion of subway work on Colaba-Bandre-Seepz Metro 3 line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो