१०० वर्षे आयुष्य ! पाहा काय आहे खास मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमध्ये

By सचिन लुंगसे | Published: May 29, 2023 01:49 PM2023-05-29T13:49:59+5:302023-05-29T13:50:34+5:30

दररोज ७० हजार वाहने या पुलावरून जाऊ शकणार आहेत.

100 years of life! See what s special in Mumbai Trans Harbor Link | १०० वर्षे आयुष्य ! पाहा काय आहे खास मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमध्ये

१०० वर्षे आयुष्य ! पाहा काय आहे खास मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमध्ये

googlenewsNext

सचिन लुंगसे

मुंबई, नवी मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांतील अंतर कमी करणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा प्रकल्प असून, भूकंप, चक्रीवादळ, वाऱ्याचा दाब आणि भरती-ओहोटीच्या प्रभावामध्ये टिकून राहण्यासाठी त्याची संरचना तयार करण्यात आली आहे. सागरी सेतू पुढील १०० वर्षांपर्यंत टिकून राहण्यासाठी गंजरोधक सामग्रीपासून बनलेला आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी १० देशांतील तज्ज्ञ आणि सुमारे १४ हजार मजुरांनी तीन पाळ्यांमध्ये अहोरात्र काम केले.  दररोज ७० हजार वाहने या पुलावरून जाऊ शकणार आहेत.

  • एप्रिल २०१८ मध्ये प्रत्यक्षात हा प्रकल्प सुरू करण्यात आला.
  • अत्याधुनिक जपानी तंत्रज्ञानाचा वापर करून, हा अद्वितीय पूल बांधण्यात आला.
  • हा पूल एका बाजूला मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि दुसऱ्या बाजूला जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट असलेल्या मुंबई खाडीमध्ये आहे.
     

तिसरी मुंबई
  नवी मुंबईसाठी हा प्रकल्प उपयुक्त असणार आहे. 
  कारण या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था, गृहसंकुल, माहिती तंत्रज्ञान पार्क होणार असल्याने तिसरी मुंबई तयार होईल. 
  हा प्रकल्प पुढे जाऊन जेएनपीटी, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गास जोडणार आहे.

५ मिनिटांत नरिमन पॉइंट
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासोबत आणखीन एक महत्त्वाचा प्रकल्प एमएमआरडीएच्या माध्यमातून साकार होणार असून, ज्यामुळे पूर्व मुक्त मार्गावरील ऑरेंज गेटपासून ५ मिनिटांत नरिमन पॉइंटला पोहोचता येईल, तसेच तो अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांना पूरक ठरणार आहे.

कोणी केले काम
केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या सहकार्याने, तसेच जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्थेच्या अर्थसाहाय्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हा प्रकल्प पूर्णत्वास नेत आहे.

अभियांत्रिकी आविष्कार 
फ्लेमिंगो पक्षांच्या अधिवासालाही कमीतकमी अडथळा होईल, अशा उपाययोजना करून बांधण्यात आलेला हा अभियांत्रिकी आविष्कार आहे.

तेलाची वाहतूक 
कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या समुद्राखालील वाहिन्या, भाभा अणुसंशोधन संशोधन केंद्र आणि बीपीसीएलच्या तेल टर्मिनल्सची सुरक्षितता लक्षात घेऊन, प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे.

दिशादर्शक ठरणार
मुंबई महानगर विकासाचा दर वाढवून हा प्रकल्प मुंबईच्या विस्तारासाठी दिशादर्शक ठरणार आहे. भौगोलिक मर्यादांचे अडथळे पार करून, देशाची अर्थिक राजधानी असलेल्या मुंबई बाजारपेठेबाहेरील बांधकाम, उद्योग, पर्यटन,आदरातिथ्य, लॉजिस्टिक्स इत्यादींचा विस्तार अपेक्षित आहे. वर्षाअखेरीस हा वाहतुकीसाठी खुला केला जाईल.
- एस.व्ही.आर.
श्रीनिवास, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

Web Title: 100 years of life! See what s special in Mumbai Trans Harbor Link

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई