दहिसरमधील कोविड सेंटर येथे आपत्कालीन वीजपुरवठ्यासाठी १००० केव्हीएचे ट्रॉली-माउंटेड मोबाइल उपकेंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:07 AM2021-02-26T04:07:15+5:302021-02-26T04:07:15+5:30

मुंबई : सब-स्टेशन उपकरणे बंद पडल्यास, व्यावसायिक व निवासी ग्राहकांचा भार तात्पुरता मोकळा करण्याची वेळ आल्यास आणि आपत्कालीन वीज ...

1000 KVA Trolley-Mounted Mobile Substation for Emergency Power Supply at Kovid Center, Dahisar | दहिसरमधील कोविड सेंटर येथे आपत्कालीन वीजपुरवठ्यासाठी १००० केव्हीएचे ट्रॉली-माउंटेड मोबाइल उपकेंद्र

दहिसरमधील कोविड सेंटर येथे आपत्कालीन वीजपुरवठ्यासाठी १००० केव्हीएचे ट्रॉली-माउंटेड मोबाइल उपकेंद्र

Next

मुंबई : सब-स्टेशन उपकरणे बंद पडल्यास, व्यावसायिक व निवासी ग्राहकांचा भार तात्पुरता मोकळा करण्याची वेळ आल्यास आणि आपत्कालीन वीज पुरवण्याची वेळ आल्यास अडचण येऊ नये म्हणून अदाणी इलेक्ट्रिसिटीने प्रायोगिक तत्त्वावर १००० केव्हीए ट्रॉली माउंटेड मोबाइल उपकेंद्र विकसित केले आहे. आता हे ट्रॉली-माउंटेड मोबाइल उपकेंद्र दहिसर येथील कोविड सेंटरमध्ये असून, मे २०२०पासून हे सब-स्टेशन अखंडित वीजपुरवठा करत आहे. भविष्यात आणखी केंद्र निर्माण केली जाणार आहेत.

ट्रॉली-माउंटेड मोबाइल उपकेंद्र मर्यादित काळापुरते विशिष्ट स्थळावर वापरले जाऊ शकते. कोणत्याही स्थळावर, सबस्टेशनच्या आवारात, प्रदर्शनस्थळी तसेच अन्य स्थळांवर हे उपकेंद्र प्रस्थापित केले जाऊ शकते. उपकेंद्र हलवता येण्याजोगे असल्याने त्याच्या वाहतुकीसाठी वाहतूक शाखेची परवानगी आवश्यक असते. कारण हे उपकेंद्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी स्वतंत्र टोविंग वाहनाची गरज भासते. हे उपकेंद्र पुरवठ्याच्या उपयोजनानुसार काही तासांपासून ते दोन-तीन महिन्यांपर्यंतच्या काळासाठी स्थापित केले जाऊ शकते. या ट्रॉली उपकेंद्राचा फायदा म्हणजे यासाठी पारंपरिक सबस्टेशनच्या तुलनेत कमीत-कमी वेळ मिळतो.

Web Title: 1000 KVA Trolley-Mounted Mobile Substation for Emergency Power Supply at Kovid Center, Dahisar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.