Join us

निवासी डॉक्टरांना १० हजारांची वेतनवाढ; प्रस्तावित संप मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 8:12 AM

राज्यातील ‘मार्ड’चा प्रस्तावित संप मागे; रुग्णसेवा राहणार सुरळीत

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात १० हजार रुपयांची भरीव वाढ करण्यासह त्यांचे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर राज्यातील निवासी डॉक्टरांनी आपला प्रस्तावित संप मागे घेतला. मंत्रालयात झालेल्या बैठकीत निवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. संप मागे घेण्याचे आवाहन अजित पवारांनी केल्यानंतर सेंट्रल मार्ड संघटनेने प्रस्तावित संप मागे घेतला. 

महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांना इतर राज्यांच्या तुलनेत कमी विद्यावेतन मिळत असल्याबाबतचे वृत्त लोकमतने बुधवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते.

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसमुंबईमार्ड