पतपेढीच्या निवडणूकीत १०२ शिक्षक

By Admin | Published: April 6, 2015 05:28 AM2015-04-06T05:28:53+5:302015-04-06T05:28:53+5:30

जिल्ह्यात वार्षिक परीक्षांचा हंगाम सुरू आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांनंतर आता मोर्चा पहिली ते नववीच्या माध्यमिक तसेच प्राथमिक विद्यार्थ्यांच्या परीक्षांकडे वळला आहे.

102 teachers in the election of Credit | पतपेढीच्या निवडणूकीत १०२ शिक्षक

पतपेढीच्या निवडणूकीत १०२ शिक्षक

googlenewsNext

भरत उबाळे, शहापूर
जिल्ह्यात वार्षिक परीक्षांचा हंगाम सुरू आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांनंतर आता मोर्चा पहिली ते नववीच्या माध्यमिक तसेच प्राथमिक विद्यार्थ्यांच्या परीक्षांकडे वळला आहे. परीक्षांचे वातावरण सुरू असतानाच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना मात्र शिक्षक सहकारी पतपेढीच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. निवडणुकीसाठी प्रचारात व्यग्र असलेल्या शिक्षकांमुळे शाळांमध्येही निवडणुकीचेच वातावरण रंगू लागल्याने विद्यार्थ्यांसमोर निवडणुकीचा राजकीय आदर्श उभा होत असल्याची जोरदार चर्चा पालकांत सुरू आहे. पतपेढीच्या २३ संचालकपदांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरिता रविवारी १९ एप्रिलला मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यांतून १२० शिक्षक उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत. ही शिक्षक पतपेढी सुमारे २० कोटींची आर्थिक उलाढाल असलेली राज्यातली क्रमांक १ ची शिक्षक सहकारी संस्था आहे. शिक्षकांचे पडद्यामागील राजकारणाचे केंद्र म्हणूनही ही संस्था ओळखली जाते. पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतरही या पतपेढीचे विभाजन झाले नसल्याने होऊ घातलेली निवडणूक एकत्रित घेतली जात असून चुरशीची ठरू लागली आहे.

Web Title: 102 teachers in the election of Credit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.