Join us

सणांसाठी मध्य रेल्वेच्या १०४ उत्सव विशेष गाड्या; लांबपल्ल्यांचा प्रवास होणार सुकर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 9:12 AM

यामध्ये १०४ विशेष गाड्यांपैकी मुंबई ते नागपूर, मुंबई ते बल्हारशाह आणि पुणे ते नागपूरच्या दरम्यान धावणाऱ्या ४८ विशेष गाड्या असणार आहेत. 

मुंबई  :  मध्य रेल्वे दसरा, दिवाळी, छठ पूजेसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी १०४ विशेष गाड्या चालविणार आहे. यामध्ये १०४ विशेष गाड्यांपैकी मुंबई ते नागपूर, मुंबई ते बल्हारशाह आणि पुणे ते नागपूरच्या दरम्यान धावणाऱ्या ४८ विशेष गाड्या असणार आहेत. 

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०२१३९/०२१४० सीएसएमटी - नागपूर द्विसाप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाड्यांच्या एकूण २० फेऱ्या धावणार आहेत. ट्रेन क्रमांक ०२१३९ सुपरफास्ट स्पेशल सीएसएमटी येथून १९ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबरच्या दरम्यान दर सोमवार आणि गुरुवारी रात्री १२:२० वाजता सुटेल व त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०२१४० सुपरफास्ट स्पेशल २१ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत मंगळवार आणि शनिवारी दुपारी १:३० वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४:१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल, तसेच नागपूर - पुणे साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (१० फेऱ्या) असणार आहेत. त्यामध्ये ट्रेन क्रमांक ०२१४४ सुपरफास्ट स्पेशल १९ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक गुरुवारी सायंकाळी ७:४० वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:२५ वाजता पुणे येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०२१४३ सुपरफास्ट स्पेशल २० ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबरपर्यंत दर शुक्रवारी पुणे येथून दुपारी ४:१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३० वाजता नागपूर येथे पोहोचेल. 

साप्ताहिक विशेष गाड्यांचा १४ फेऱ्या- लोकमान्य टिळक टर्मिनस-समस्तीपूर वातानुकूलित साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल- १४ फेऱ्या- लोकमान्य टिळक टर्मिनस - बनारस साप्ताहिक विशेष १४ फेऱ्या- मुंबई ते मंगळुरू जंक्शन साप्ताहिक विशेष गाड्यांचा १४ फेऱ्या- पुणे जंक्शन ते अजनी वातानुकूलित सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाड्यांचा १४ फेऱ्या - पुणे ते गोरखपूर सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाड्यांचा १४ फेऱ्या असणार आहेत.

टॅग्स :भारतीय रेल्वेरेल्वेप्रवासी