उत्तर मुंबईत आज १०४४ युनिट विक्रमी रक्त संकलन; आमदार आशिष शेलार यांची उपस्थिती

By मनोहर कुंभेजकर | Published: July 22, 2023 06:27 PM2023-07-22T18:27:56+5:302023-07-22T18:28:09+5:30

उत्तर मुंबईत आज १०४४ युनिट विक्रमी रक्त संकलन झाले.

1044 units record blood collection in North Mumbai today Presence of MLA Ashish Shelar | उत्तर मुंबईत आज १०४४ युनिट विक्रमी रक्त संकलन; आमदार आशिष शेलार यांची उपस्थिती

उत्तर मुंबईत आज १०४४ युनिट विक्रमी रक्त संकलन; आमदार आशिष शेलार यांची उपस्थिती

googlenewsNext

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहिर झाल्याबद्धल आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज उत्तर मुंबईतून १००० युनिट रक्तदानाचा संकल्प  खासदार गोपाळ शेट्टी यांनी केला होता. उत्तर मुंबईत आज १०४४ युनिट विक्रमी रक्त संकलन झाले. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष, आमदार अँड.आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.

बोरिवली, दहिसर, मागाठाणे, कांदिवली पूर्व, चारकोप, आणि मालाड या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी झालेल्या  रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आज उत्तर मुंबईत एकूण १०४४ युनिट रक्त जमा झाले असून, १००० युनिटचा संकल्प मागे टाकल्याची माहिती खासदार शेट्टी यांनी दिली. तर कोरोना महामारीनंतर उत्तर मुंबईत १० हजार युनिट रक्त संकलनाचे भगीरथ कार्यही करण्यात आले होते अशी माहिती त्यांनी दिली.

बोरिवली पश्चिम येथील कस्तुरपार्क प्रार्थना सभागृहात दीपप्रज्वलन त्यांनी  रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. कांदिवली पूर्व येथे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार अँड. आशिष शेलार व खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. तर दहिसर पश्चिम  येथील फ्रेंड्स बॅक्वेट हॉल येथे स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांनी रक्तदान शिबीर आयोजित केले होते.

बोरिवली, दहिसर, मागाठाणे, कांदिवली पूर्व, चारकोप, आणि मालाड या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी झालेल्या  रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आज उत्तर मुंबईत एकूण १०४४ युनिट रक्त जमा झाले असून, १००० युनिटचा संकल्प मागे टाकल्याची माहिती खासदार शेट्टी यांनी दिली.तर कोरोना महामारीनंतर उत्तर मुंबईत १० हजार युनिट रक्त संकलनाचे भगीरथ कार्यही करण्यात आले होते अशी माहिती त्यांनी दिली.

खा. गोपाळ शेट्टी यांनी प्रत्येक विधानसभेच्या शिबिरांना भेट देऊन रक्तदात्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. चारकोप कल्चरल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन, सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मक मंडळ आणि जीवन विद्या मिशन यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला.रक्तदान हे जीवनदान असून या सेवायज्ञात योगदान देणाऱ्या १०४४ रक्तदाते, आयोजक आणि रक्तपेढीतून येणारे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.

मागाठाणे येथे मनमोहन मेहता यांनी आज भाजपच्या शिबिरात १०७ व्यांदा रक्तदान करण्याचा विक्रम केला.तर
बोरिवली येथील शमा जोशी व श्रीनिवास जोशी अशा पती-पत्नींनीही रक्तदान केले. दहिसर येथील आजच्या रक्तदान शिबिरात योगदान देऊन पिता-पुत्र जोडीने समाजाला एक प्रेरणादायी संदेश दिला आहे. उत्तर मुंबईत आयोजीत या रक्तदान शिबिरात खा.गोपाळ शेट्टी सोबत जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, श्रीकांत पांडे, डॉ.योगेश दुबे,अँड.सिद्धार्थ शर्मा, युवा अध्यक्ष अमर शाह, अँड.ज्ञानमुर्ती शर्मा आणि अनेक पदाधिकारी वेगवेगळ्या स्थानी उपस्थित होते.

Web Title: 1044 units record blood collection in North Mumbai today Presence of MLA Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.