Join us

राज्यात दिवसभरात कोरोनाचे १०,४८३ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 6:27 AM

मृत्युदर ३.४९%; बरे होणाऱ्यांची संख्या १०,९०६

मुंबई : राज्यात शुक्रवारी १० हजार ४८३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या ४ लाख ९० हजार २६२ झाली आहे. बाधितांप्रमाणे बरे होणाऱ्यांची संख्याही आज १० हजार ९०६ इतकी होती.

राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख २७ हजार २८१ नागरिक कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६६.७६ टक्के एवढे आहे. सध्या १ लाख ४५ हजार ५८२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज ३०० कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या मृत्युदर ३.४९ टक्के एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी २२९ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत, तर ४० मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ३१ मृत्यू हे त्याआधीच्या काळातील आहेत. ३१ मृत्यूंपैकी सर्वाधिक १४ रायगड, ठाणे आणि नाशिकमध्ये प्रत्येकी चार तर पालघर आणि पुण्यातील प्रत्येकी तीन मृत्यू आहेत. याशिवाय जळगाव, कोल्हापूर आणि मुंबईतील प्रत्येकी एका मृत्यूचा यात समावेश आहे.

आज निदान झालेल्या ३०० मृत्यूंमध्ये मुंबई मनपा ४५, ठाणे ५, ठाणे मनपा १०, नवी मुंबई मनपा ४, कल्याण-डोंबिवली मनपा ६, उल्हासनगर मनपा २, भिवंडी-निजामपूर मनपा ४, मीरा-भार्इंदर मनपा ३, वसई-विरार मनपा १४, रायगड ९, पनवेल मनपा १९, नाशिक २, नाशिक मनपा २३, मालेगाव मनपा १, अहमदनगर ४, अहमदनगर मनपा १, धुळे २, धुळे मनपा १, जळगाव ५, जळगाव मनपा १, पुणे १७, पुणे मनपा ३५, पिंपरी-चिंचवड १८, सोलापूर ५, सोलापूर २, सातारा ६, कोल्हापूर ६, सांगली १, रत्नागिरी ३, औरंगाबाद २, औरंगाबाद मनपा २ आदी रुग्णांचा समावेश आहे.मुंबईत ७७ टक्केरुग्ण कोरोनामुक्तकोरोनाबाधितांची संख्या मुंबईत आता ८५ दिवसानंतर दुप्पट होत आहे. तसेच रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.८२ टक्के एवढा आहे. शुक्रवारी दिवसभरात तब्बल १,२३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे आतापर्यंत ७७ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर दिवसभरात ८६२ नवीन रुग्ण आढळून आले असून ४५ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ६,६९० झाली आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस