नवीन इमारतीसाठी 106 कोटींचा खर्च
By admin | Published: December 10, 2014 02:18 AM2014-12-10T02:18:13+5:302014-12-10T02:18:13+5:30
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) नव्या प्रशासकीय इमारतीसाठी तब्बल 1क्6 कोटींचा खर्च करण्यात येत आहे.
Next
मुंबई : महानगरातील दळणवळण व्यवस्था सुदृढ करण्यासाठी कार्यरत असलेल्या मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) नव्या प्रशासकीय इमारतीसाठी तब्बल 1क्6 कोटींचा खर्च करण्यात येत आहे. विशेष म्हणजे गेल्या सात वर्षापासून सुरू असलेले त्याचे बांधकाम अद्यापही अपूर्णावस्थेत आहे. दोन वेळा मुदतवाढ मिळालेल्या या इमारतीचे काम 31 डिसेंबर्पयत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (बीकेसी) शासनाच्या जागेवर या 11 मजली इमारतीचे काम 2क्क्7 पासून सुरू आहे. त्यासाठी सुरुवातीला 87 कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र काम रखडल्याने त्यात आणखी 19 कोटींनी वाढ झाल्याची कबुली एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिळविलेल्या माहितीतून ही आकडेवारी स्पष्ट झाली आहे.
इमारतीचे काम रेलकॉन इन्फ्राप्रोजेक्टस लिमिटेड, अंतर्गत सजावटीची कामे गोदरेज कंपनी आणि विद्युत व वातानुकूलित यंत्रणोबाबतची कामे प्रवीण इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीकडे आहे. (प्रतिनिधी)
इमारतीच्या कामाला 24 डिसेंबर 2क्क्4 मंजुरी मिळाली होत़ सुरुवातीला त्याचे काम 31 डिसेंबर 2क्12 र्पयत पूर्ण करण्याचे निश्चित केले होते. मात्र त्यात आधी नऊ महिन्यांची आणि दुस:यांदा 15 महिन्यांनी मुदत वाढविण्यात आली.