कारपेटच्या आडून परदेशी सिगारेटची तस्करी, न्हावा शेवा बंदरात १०.८ कोटींचा साठा जप्त

By मनीषा म्हात्रे | Published: January 14, 2024 06:56 PM2024-01-14T18:56:12+5:302024-01-14T18:56:25+5:30

डीआरआयची कारवाई

10.8 Crore stock seized at Nhava Sheva port for smuggling of foreign cigarettes under the carpet, DRI action | कारपेटच्या आडून परदेशी सिगारेटची तस्करी, न्हावा शेवा बंदरात १०.८ कोटींचा साठा जप्त

कारपेटच्या आडून परदेशी सिगारेटची तस्करी, न्हावा शेवा बंदरात १०.८ कोटींचा साठा जप्त

मुंबई: कारपेटच्या आडून दुबईहून न्हावा शेवा बंदरात आणलेलया कंटेनरमधून १०.८ कोटींचा परदेशी सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला आहे.
 महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई युनिटने ही कारवाई केली असून अधिक  तपास सुरु आहे.

डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, नाव्हा शेवा बंदरात विदेशी सिगारेटचा साठा येणार असल्याची माहिती डीआरआयच्या मुंबई पथकाला मिळाली. त्यानुसार, पथकाने झाडाझडती घेतली. यादरम्यान "चायनीज व्हिस्कोस विणलेले कार्पेट’ म्हणून घोषित केलेल्या मालामध्ये विदेशी सिगारेटचा कंटेनर जप्त करण्यास यश आला. यामध्ये जवळपास १०.८ कोटींचा ६७.२० लाख सिगारेट्सचा समावेश आहे.

हा माल दुबईच्या जेबेल अली बंदर येथून न्हावा शेवा बंदरात पाठवण्यात आला होता. दोन कंटेनर जप्त करण्यात आले आहे. यामध्ये कोरियामध्ये तयार केलेलया सिगारेटचा समावेश आहे. कस्टम अधिकाऱ्यांपासून माल लपविण्यासाठी तस्करांनी त्यावर जुन्या वापरलेल्या कारपेटचा आधार घेतला होता. त्यानुसार, कारवाई करत डीआरआय अधिक  तपास करत आहे.

Web Title: 10.8 Crore stock seized at Nhava Sheva port for smuggling of foreign cigarettes under the carpet, DRI action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.