Join us

राज्यभरातील १०८ शिक्षकांना ‘राज्य शिक्षक गुणगौरव’ पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2023 4:29 AM

राज्य निवड समितीने केलेल्या शिफारसीनुसार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शुक्रवारी राज्यातील १०८ शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांची घोषणा केली.

मुंबई : समाजाची निःस्वार्थ भावनेने सेवा करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. राज्य निवड समितीने केलेल्या शिफारसीनुसार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शुक्रवारी राज्यातील १०८ शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांची घोषणा केली.

राज्यभरातील शिक्षकांमध्ये प्राथमिकमधील ३७, माध्यमिक गटात ३९, आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या १९, थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका ८, विशेष शिक्षक कला-क्रीडा २, दिव्यांग गटात १ आणि स्काउट - गाइड्स गटात २ अशा एकूण १०८ पुरस्कारांची जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण येत्या ५ सप्टेंबरला शिक्षकदिनी मुंबईत करण्यात येणार आहे.

मुंबईतील शिक्षकांच्या पाठीवरही कौतुकाची थापप्राथमिक स्पृहा इंदू - चेंबूर एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा डॉ. पूनम शिंदे - राजर्षी शाहुनगर हिंदी शाला, माटुंगा लेबर कॅम्प, धारावी सीमा तायडे - मुंबई पब्लिक स्कूल मालवणी, मालाड

थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रेरणा शेलवले - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माहुली तालुका शहापूर (मुंबई विभाग)

माध्यमिक मनिषा शिंदे - स्वामी श्यामानंद हायस्कूल भटवाडी घाटकोपर डॉ.हेमाली जोशी - द बोरीवली एज्युकेशन सोसायटी, आर.सी. पटेल बोरीवली डॉ.स्वाती खैरे - द ग्रेटर मुंबई एज्युकेशन सोसायटी, विलेपार्ले शमा खलीकुज्जमान तारापूरवाला - अंजुमन आय इस्लाम सैफ तैयब्बजी गर्ल्स हायस्कूल, भायखळा

टॅग्स :शिक्षक