१० तारीख उलटली, एसटी कर्मचारी वेतनाविनाच; कर्मचारी आर्थिक संकटात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 09:53 AM2023-12-11T09:53:29+5:302023-12-11T09:54:03+5:30
डिसेंबरची १० तारीख उलटून गेली तरी कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन मिळालेले नाही.
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात वेतनासाठी चार वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान वेतन देण्याचे सरकारने न्यायालयात मान्य केले होते. पण डिसेंबरची १० तारीख उलटून गेली तरी कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन मिळालेले नाही.
वर्षानुवर्षे दर महिन्याच्या ७ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळत आहे. एसटी संपावेळी प्रत्येक महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान वेतन देण्याचे सरकारने न्यायालयात मान्य केले होते. शासनाकडून महामंडळाला ऑक्टोबरच्या प्रतिपूर्तीपोटी ३२९ कोटी इतका निधी वितरित झाला असतानाही कर्मचाऱ्यांच्या खात्यात अद्याप वेतन वर्ग करण्यात आले नाही. वेतन वेळेत मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.