अंबरनाथ : रमेश गुंजाळ यांच्या हत्या प्रकरणातील १७ आरोपींपैकी ११ जणांवर पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. या प्रकरणात अद्यापही सहा आरोपींना अटक झालेली नाही. गुंजाळ यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या तपासावर शंका व्यक्त करून उपोषणाचा इशारा दिल्यावर आरोपींविरोधात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुंजाळ हत्येप्रकरणी १३ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. हत्येनंतर पोलिसांनी सचिन चव्हाण, संदीप गायकर, विशाल जव्हेरी, दीपक काळिंब, अभिषेक (गुड्डू) वारगडे, ओंकार गायकर आणि रामदास गायकर यांना अटक केली. यावेळी सचिन गायकर, शिवदास गायकर, रूपेश सासे आणि पवन कांडेकर यांची नावेदेखील तपासात पुढे आली. त्यांना अटक होण्याआधीच न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात आपली बाजू मांडली असता न्यायालयाने या आरोपींच्या जामिनाला मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. सुरुवातीच्या सात आणि नंतर अटक केलेल्या चार अशा ११ जणांविरोधात मोक्कांर्गत कारवाई केली आहे. आता फिर्यादींमधील ६ फरार आरोपींना अटक केल्यावर त्यांच्यावरही मोक्कांतर्गत कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)
११ आरोपींवर मोक्का
By admin | Published: January 31, 2016 1:54 AM