शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 08:54 AM2024-11-28T08:54:19+5:302024-11-28T08:55:00+5:30

Share Market Frauds: मुंबईतील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने शेअर बाजारातून अधिक नफा मिळवण्याचा मोहात अडकून तब्बल ११ कोटी रुपये गमावल्याचा प्रकार समोर आला आहे. 

11 crore lost in the temptation to get better returns from share market; What happened to the officer in Mumbai? | शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?

शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?

Stock Market Frauds Mumbai: सायबर गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. लोकांना आमिष दाखवून, भीती घालून कोट्यवधि रुपयांचा गंडा सायबर ठगांकडून घातला जात आहे. अशीच एक घटना आता मुंबईत घडली असून, जहाजावर कॅप्टन राहिलेल्या एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ११ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. 

शेअर बाजारात पैसे गुंतवून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत या अधिकाऱ्याला सायबर ठगांनी गंडा घातला. ऑगस्ट आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यात अधिकाऱ्याने चांगला नफा मिळवण्याच्या मोहात ११.१६ कोटी रुपये गमावले. 

एका आरोपीला अटक

एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी या सायबर क्राइम प्रकरणात कैफ इब्राहिम मन्सुरी नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. त्यांच्याजवळ वेगवेगळ्या बँकांचे तब्बल ३३ डेबिट कार्ड आणि १२ चेकबुक सापडले. 

शेअर बाजारातगुंतवणूक करण्यात रस असलेल्या लोकांना जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दिले जात होते. सुरूवातीला लोकांना त्यांच्या गुंतवणूक खात्यात ऑनलाईन नफा दिसला. पण, जेव्हा त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना २० टक्के सर्व्हिस टॅक्स भरण्यास सांगण्यात आले. 

सर्व्हिस टॅक्स भरण्यास सांगण्यात आल्यानंतर संबंधित व्यक्तीला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्याने तातडीने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. 

गुंतवणुकीच्या नावावर ११.१६ कोटी रुपये उकळले

पोलिसांनि दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या काळात तक्रारदाराकडून ११.१६ कोटी रुपये घेण्यात आले. तपासादरम्यान असे समोर आले की, या ठगांनी पैसे काढण्यासाठी अनेक बँक खात्याचा वापर केला. तक्रारदार त्या खात्यांमध्ये पैसे पाठवले होते. २२ वेळा पैसे पाठवले होते. पोलिसांनी त्या बँक खात्यावर नजर ठेवण्यास सुरूवात केली. त्यावेळी एका महिलेने चेकद्वारे ६ लाख रुपये काढल्याचे कळले. 

पोलिसांनी त्या महिलेची चौकशी केली. तिने कैफ इब्राहिम मन्सुरी याच्या सांगण्यावरून पैस काढल्याचे सांगितले. पोलिसांनी मन्सुरीला दक्षिण मुंबईतून अटक केली. त्याच्याजवळ १२ वेगवेगळ्या बँकांचे ३३ डेबिट कार्ड सापडले, त्याचा वापर करून त्याने ४४ लाख रुपये ट्रान्सफर केले होते. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. 

Web Title: 11 crore lost in the temptation to get better returns from share market; What happened to the officer in Mumbai?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.