राज्यातील ११ उपअधीक्षक, एसीपींना पदोन्नती, बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:05 AM2021-04-18T04:05:37+5:302021-04-18T04:05:37+5:30

गृह विभागाचे आदेश जारी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य पोलीस दलात कार्यरत सहा पोलीस निरीक्षकांना उपअधीक्षक, सहाय्यक अधिकारी ...

11 Deputy Superintendents of the State, ACPs promoted, transferred | राज्यातील ११ उपअधीक्षक, एसीपींना पदोन्नती, बदली

राज्यातील ११ उपअधीक्षक, एसीपींना पदोन्नती, बदली

Next

गृह विभागाचे आदेश जारी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य पोलीस दलात कार्यरत सहा पोलीस निरीक्षकांना उपअधीक्षक, सहाय्यक अधिकारी म्हणून बढती देण्यात आली आहे तर ५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गृह विभागाने शुक्रवारी याबाबतचे आदेश जारी केले.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१च्या कलम २२(न) अन्वये सरकारने पदाेन्नती व बदली केली आहे.

पदोन्नती मिळालेल्यांची नावे (कंसात कोठून - कोठे) : दत्तात्रय शंकर पाटील (मीरा भाईंदर - मुंबई), दुर्योधन पवार (पुणे सिटी - पुणे लोहमार्ग,), चंद्रसेन देशमुख (लातूर - नांदेड), शहाजी नरसुडे (नाशिक ग्रामीण - सीआयडी, पुणे), गोकुळसिंह पाटील (मुंबई - वर्धा) व विजय दरेकर (ठाणे - लोहमार्ग, मुंबई)

बदली झालेल्यांची नावे : रमेश सरवदे (नांदेड बदली आदेशाधिन - सोलापूर), दिलीप टिपरसे (तुळजापूर, उस्मानाबाद - महामार्ग सुरक्षा, औरंगाबाद), ईश्वर कातकडे (प्रतीक्षाधिन - मुख्यालय, धुळे), दत्तात्रय आनंद पाटील (प्रतीक्षाधिन - सीआयडी, पुणे) व संजय सावंत (जात पडताळणी धुळे बदली आदेशाधिन - पोलीस प्रशिक्षण केंद्र, नाशिक)

..................................................

Web Title: 11 Deputy Superintendents of the State, ACPs promoted, transferred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.