Join us

विविध देशांतील १४ जहाजामधील ११ हजार ८१ नाविक कर्मचारी मुंबई बंदराद्वारे घरी परतले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 5:07 PM

कोरोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊन कालावधीत जगाच्या विविध देशांच्या जहाजामध्ये असलेल्या हजारो नाविकांना घरी परतणे अशक्य झाले होते.

 

मुंबई : कोरोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊन कालावधीत जगाच्या विविध देशांच्या जहाजामध्ये असलेल्या हजारो नाविकांना घरी परतणे अशक्य झाले होते. मात्र केंद्र सरकारने त्या नाविकांना घरी परतायचे असेल (साईन ऑफ)  व ज्या नाविकांना घरातून कामावर जायचे असेल (साईन इन) त्यांना कामावर जाण्यासाठी व  घरी परतण्यासाठी परवानगी दिल्यानंतर मोठ्या संख्येने नाविक जहाजातून घरी परतले आहेत. केवळ मुंबई पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून आतापर्यंत 14 जहाजांद्वारे 11 हजार  81 नाविक घरी परतले आहेत. 

नौकावहन मंत्रालयाने यासाठी विशेष प्रयत्न केले होते. नौकावहन मंत्री मनसुख मांडवीय यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर ही परवानगी केंद्रीय गृह मंत्रालय पकडून मिळाली होती. त्यामुळे कामाचा कालावधी समाप्त झाल्यानंतरही केवळ अडचणींमुळे अडकून पडलेल्या नाविकांना घरी परतणे व कुटुंबियांसोबत राहणे शक्य होऊ शकले. या नाविकांची सुरुवातीला बंदरावर उतरल्यावर कोरोनाची चाचणी करण्यात आली. चाचणीचा अहवाल नकारात्मक  आल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले. सुरुवातीला त्यांच्या तपासण्या बंदरावर करण्यात येत होत्या त्यानंतर त्यांच्या तपासण्या जहाजावरच करण्यास प्रारंभ करण्यात आला. मुंबई पोर्ट ट्रस्ट ने या सर्व कामात नाविकांना मोठे सहकार्य केले. मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया , वरिष्ठ ट्रँफिक अधिकारी व क्रुझ विभागाचे नोडल अधिकारी गौतम डे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात आले.  आता नाविक कामावर रुजू होण्यास देखील प्रारंभ झाला आहे. जी जहाजे कर्मचारी सोडण्यास येतात त्याद्वारे काही नाविक कामावर रुजू होत आहेत. मुंबई बंदरात14 जहाजांद्वारे 11 हजार 81 नाविक मुंबईत परतले आहेत.  

टॅग्स :लॉकडाऊन अनलॉककोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्या