Join us  

११ गावांची पाणीयोजना बंद

By admin | Published: May 26, 2014 4:49 AM

तालुक्यातील अकरा पाणीटंचाईग्रस्त गावांच्या वेगवेगळ्या कारणाने नळपाणी पुरवठा योजना बंद झाल्या आहेत.

हुसेन मेमन, जव्हार - तालुक्यातील अकरा पाणीटंचाईग्रस्त गावांच्या वेगवेगळ्या कारणाने नळपाणी पुरवठा योजना बंद झाल्या आहेत. त्यामुळे या अकरा गावाच्या रहिवाशांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावून मैलोन्मैल पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. तालुक्यातील करढण, विनवह, बोराळे, नांदगाव, श्रीरामपुर, झीप, चिंचवडी, नांदगाव बंदार्‍याचीवाडी, किरमीरा, बरवाडपाडा, धामोशी, कडाचीमेट, गरदवाडी या गावांना पाणीपुरवठा विभागांकडून व लोकसहभागातून लाखो रुपये खर्च करून राज्य सरकारने ग्रामीण भागातील पाणीटंचाई गावपाड्यांना नळपाणी पुरवठा योजना चालू केल्या, मात्र या अकरा गावांच्या नळपाणीपुरवठा योजना सध्याही बंद अवस्थेत आहेत. पाणीपुरवठा विभागाचे अभियंते व संबंधित ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे नळपाणी पुरवठा योजना रखडल्या आहेत, तर पाण्याची टाकी व विहिरी अर्धवट बांधण्यात आल्या आहेत. काही गावांच्या जमिनीतून पाईपलाईन टाकण्याचे कामही रखडले आहे. त्यामुळे या महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. बंद पाईपलाईनचे काम चालू करण्यासाठी पाणीपुरवठा पंचायत समिती जव्हारला वारंवार निवेदने दिली आहेत, मात्र अद्याप कार्यवाही झालेली नसल्याचे धानोशी, कडाचीमेटचे सरपंच कैलास घाटाळ यांनी सांगितले.