अग्निशमन दलात ११ वॉटर टँकर्स; महापौरांच्या हस्ते फ्लॅगआॅफ, पालिका झाली अधिक सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 05:19 AM2017-11-04T05:19:41+5:302017-11-04T05:19:55+5:30

मुंबई अग्निशमन दलाच्या वापराकरिता ११ नवीन वॉटर टँकर्स घेण्यात आले आहेत़ वॉटर टँकरची प्रत्येकी क्षमता १४ हजार लीटर इतकी आहे. या वाहनांचा फ्लॅगआॅफचा कार्यक्रम विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते महापालिका मुख्यालय येथे शुक्रवारी करण्यात आला.

11 water tankers in the fire fighting force; The Flag Officer in the hands of the Mayor, the more successful the municipality was | अग्निशमन दलात ११ वॉटर टँकर्स; महापौरांच्या हस्ते फ्लॅगआॅफ, पालिका झाली अधिक सक्षम

अग्निशमन दलात ११ वॉटर टँकर्स; महापौरांच्या हस्ते फ्लॅगआॅफ, पालिका झाली अधिक सक्षम

Next

मुंबई : मुंबई अग्निशमन दलाच्या वापराकरिता ११ नवीन वॉटर टँकर्स घेण्यात आले आहेत़ वॉटर टँकरची प्रत्येकी क्षमता १४ हजार लीटर इतकी आहे. या वाहनांचा फ्लॅगआॅफचा कार्यक्रम विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते महापालिका मुख्यालय येथे शुक्रवारी करण्यात आला.
जागतिक स्तरावरील मुंबई शहराचे स्थान लक्षात घेता, या शहरात कोणतीही दुर्घटना घडली तर महापालिका सक्षम पद्धतीने सामोरे जाण्यास सतर्क असल्याचे प्रतिपादन महापौर महाडेश्वर यांनी या वेळी केले. ते म्हणाले की, पालिका काळाप्रमाणे बदलत आहे. मुंबई शहरातील बदलती स्थित्यंतरे लक्षात घेऊन पालिकेतही आधुनिक यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. मुंबईत नियमित काही घटना घडत असतात. अशावेळी मुंबई अग्निशमन दल काही मिनिटांत तेथे पोहोचत असते.
अग्निशमन दलाचे जवान जिवाची बाजी लावून प्राणहानी व वित्तहानी टाळण्यासाठी झटत आहेत.
मुंबई अग्निशमन दल आधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज असल्याचेही महापौर म्हणाले.

Web Title: 11 water tankers in the fire fighting force; The Flag Officer in the hands of the Mayor, the more successful the municipality was

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई