२८८ पैकी ११० आमदार पहिल्यांदा विधानसभेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 06:31 AM2019-11-03T06:31:50+5:302019-11-03T06:32:00+5:30

नवे राजकीय चित्र। राष्टÑवादीचे ५४ पैकी तब्बल २८ तर भाजपचे २६, कॉँग्रेस व शिवसेनेचे १८ पहिलटकर आमदार

110 out of 288 MLAs for the first time in the Assembly | २८८ पैकी ११० आमदार पहिल्यांदा विधानसभेत

२८८ पैकी ११० आमदार पहिल्यांदा विधानसभेत

googlenewsNext

अतुल कुलकर्णी 

मुंबई : १४ व्या विधानसभेत तब्बल ११० आमदार पहिल्यांदा निवडून आले आहेत. तर दहा पक्षांचे दहा आमदारही पहिल्यांदाच विधानसभेच्या सभागृहात येतील. यापैकी विधानपरिषदेचे चार सदस्य विधानसभेत येतील. निवडून आलेल्यांमध्ये सगळ््यात जास्त म्हणजे ५४ टक्के आमदार राष्टÑवादी काँग्रेसचे आहेत. त्याखालोखाल ४३ टक्के आमदार काँग्रेसचे आहेत. सगळ्यात कमी फक्त २५ टक्के नवे चेहरे भाजपमधून आले आहेत तर त्या खालोखाल ३३ टक्के नवे चेहरे शिवसेनेतून आलेले आहेत.

भाजपने मेगा भरती सुरु केली आणि त्याचा फायदा त्यांना किती झाला माहिती नाही, पण काँग्रेस आणि राष्टÑवादीने याचा पुरेपुर फायदा घेत स्वत:च्या पक्षांमध्ये नवे चेहरे आणले. त्यातही तरुण चेहऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. विधान परिषदेतून जे चार सदस्य विधानसभेत आले आहेत त्यात विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे राष्टÑवादीमधून, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील भाजपमधून, जलसंधारण मंत्री तानाजी सावंत शिवसेनेतून आणि मूळ राष्टÑवादीचे असणारे राहुल नार्वेकर हे भाजपच्या तिकीटावर निवडून आले.
एमआयएमचे दोन, राष्टÑीय समाज पक्ष, मनसे, प्रहार, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, माकप, बहुजन विकास आघाडी आणि समाजवादी पक्ष या आठ पक्षांचे प्रत्येकी १ आमदार पहिल्यांदाच विधानसभेत येतील. १३ अपक्ष आमदार निवडून आले. त्यापैकी १० आमदार बंडखोर आहेत. मंजुळा गावित (साक्री), किशोर जोगावार (चंद्रपूर), गीता जैन (मीरा भार्इंदर), महेश बालदी (उरण) हे भाजपचे पाच बंडखोर निवडून आले. तर चंद्रकांत भोंडेकर (मुक्ताईनगर), नरेंद्र भोंडेकर (भंडारा), आशिष जैस्वाल (रामटेक) हे तीन शिवसेना बंडखोर अपक्ष म्हणून निवडून आले. त्याशिवाय संजय शिंदे (करमाळा), राजेंद्र यड्रावकर (शिरोळ) हे दोघे राष्टÑवादीचे बंडखोर अपक्ष म्हणून निवडून आले.

विधिमंडळाने नेमलेल्या समित्यांचे सगळे प्रमुख पराभूत
विधिमंडळ विविध समित्या नेमत असते. या समित्यांवर सरकार अनेक आमदारांच्या नेमणुका करत असते. या समितीचे सगळे प्रमुख निवडणुकीत पराभूत झाले आहेत. या प्रमुख समित्यांमधील शिवसेनेकडे असणाºया अंदाज समितीचे अनिल कदम, उपविधान समिती, विनंती अर्ज समिती व विधानसमितीचे उपाध्यक्ष विजय औटी, आश्वासन समितीचे जयप्रकाश मुंदडा, इतर मागासवर्गीय कल्याण समितीचे सुभाष साबणे पराभूत झाले. तर भाजपकडे असणाºया समित्यांपैकी सार्वजनिक उपक्रम समितीचे डॉ. अनिल बोंडे, पंचायत राज समितीचे सुधीर पारवे, अल्पसंख्याक कल्याण समितीचे चैनसूख संचेती हेही पराभूत झाले आहेत. तर लोकलेखा समितीवर कायम विरोधी पक्षाच्या सदस्यांची नेमणूक केली जाते. त्या समितीचे गोपाळदास अग्रवाल काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले आणि निवडणुकीत पराभूत झाले.


पक्ष विजयी जागा पहिलटकर टक्के
राष्टÑवादी ५४ २८ ५४%
काँग्रेस ४४ १८ ४३%
शिवसेना ५६ १८ ३३%
भाजप १०५ २६ २५%

Web Title: 110 out of 288 MLAs for the first time in the Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.