नसबंदी करणाऱ्या पुरुषांना ११००, तर महिलांना ६०० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 05:41 AM2019-01-19T05:41:48+5:302019-01-19T05:41:52+5:30
मुंबई महापालिकेचा स्त्री-पुरुष समानतेत भेदभाव : दोघांनाही समान रक्कम देण्याची वॉचडॉग फाउंडेशनची मागणी
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : आज देशासह मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे १ कोटी ६० लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून नसबंदी करणाºया पुरुष व महिलांना प्रोत्साहन म्हणून आर्थिक मोबदला महापालिका देत आहे. मात्र मुंबई महापालिका स्त्री-पुरुष समानतेत भेदभाव करत असून नसबंदी करणाºया पुरुषांना ११०० तर नसबंदी करणाºया महिलांना ६०० रुपये इतकी रक्कम महापालिका देत आहे.
एकीकडे देश प्रगतीकडे वाटचाल करत असताना आणि आपण स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी करत असताना मुंबई महानगरपालिका असा भेदभाव का करते, असा सवाल वॉचडॉग फाउंडेशनचे संचालक गॉडफ्रे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांनी केला आहे.
लोकसंख्या नियंत्रणात आणण्याचा पालिकेचा स्तुत्य उपक्रम असला तरी त्यांनी स्त्री व पुरुष समानतेचा पुकार करत नसबंदी करणाºया पुरुषांना व स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून समान रक्कम द्यावी. तसेच जास्तीत जास्त स्त्री व पुरुष या योजनेचा लाभ घेण्यासाठी रकमेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी या प्रकरणी राज्याचे मुख्य सचिव डी.के. जैन यांना ई-मेल पाठवताच, त्यांनी याची दखल घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
च्पालिकेचा उपक्रम स्तुत्य असला तरी समानतेला तडा देण्यात आल्याचा आरोप वॉचडॉग फाउंडेशनने केला.
च्समान रक्कम देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.