११ हजार पाेलिसांना मिळणार सुसज्ज घरे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 02:20 AM2020-11-24T02:20:21+5:302020-11-24T02:20:44+5:30
३ हजार फ्लॅटची पूर्तता; प्रकल्प कार्यान्वित
जमीर काझी
मुंबई : जनतेच्या संरक्षणासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलिसांसाठी खूशखबर आहे. राज्यभरातील जवळपास साडेअकरा हजार अंमलदारांना येत्या दोन ते अडीच वर्षांत सर्व सोयींनी युक्त सुसज्ज व अद्ययावत घरे मिळणार आहेत. यापैकी ३ हजार फ्लॅटचा ताबा संबंधित घटक प्रमुखांकडे देण्यात आला आहे.
कोरोनाच्या महामारीचा फटका सर्व क्षेत्राला बसला आहे. मात्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने नियोजित प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्याचा धडाका कायम ठेवला आहे. गेल्या तीन वर्षांत हजारो कोटींचे ४५ मोठे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यातून सुसज्ज ३ हजारांहून अधिक निवासी व अनिवासी गाळे बांधून पूर्ण झाल्याचे महासंचालक व विभागाचे कार्यकारी संचालक बिपिन बिहारी यांनी सांगितले. येत्या अडीच वर्षांत ४६ निविदांतर्गत विविध प्रकारच्या ७१ प्रकल्पांची बांधकामे पूर्ण करण्यात येतील. शासकीय भूखंड शोधून तेथे प्रकल्प राबविले जात असल्याचे बिहारी यांनी सांगितले.
अनिवासी व निवासी घरांची गरज लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मोठे प्रकल्प राबिवले जात आहेत. आवश्यक निधीची पूर्तता केली जात आहे.
- बिपिन बिहारी, महासंचालक
व कार्यकारी संचालक
कार्यरत पोलीस गृहप्रकल्प
जिल्हा प्रकल्प घरे
मुंबई ९ २३७७
ठाणे, कोकण, ११ ६८७
नाशिक
नागपूर, अमरावती ३९ २२७४
कोल्हापूर, पुणे ६ ८९३
औरंगाबाद, नांदेड ६ १०९४
एकूण ७१ ७३२५
प्रक्रिया सुरू असलेले प्रकल्प
जिल्हा प्रकल्प निवासस्थाने
ठाणे, नाशिक, ६ ७६
कोकण
नागपूर, अमरावती ७ १९२
कोल्हापूर, पुणे ४ ९००
एकूण १७ ११६८