दिवाळीपूर्वी म्हाडाच्या १ हजार १९४ घरांची लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 07:34 AM2018-09-29T07:34:01+5:302018-09-29T07:34:12+5:30
दिवाळीपूर्वी म्हाडाकडून १ हजार १९४ घरांची लॉटरी काढण्यात येईल, अशी घोषणा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
मुंबई - दिवाळीपूर्वी म्हाडाकडून १ हजार १९४ घरांची लॉटरी काढण्यात येईल, अशी घोषणा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली. गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनीदेखील यापूर्वीच म्हाडाची लॉटरी आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये काढली जाईल, असे प्रसारमाध्यमांना सांगितले होते.
वडाळ्यातील अॅन्टॉप हिल येथे अत्यल्प उत्त्पन्न गटासाठी २७८ घरे असतील, घराची किंमत पावणे एकतीस लाखांच्या आसपास असेल. सायन प्रतीक्षानगर येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी ८३ घरे असतील, घराची किंमत पावणे एकोणतीस लाखांच्या आसपास असेल. सायन प्रतीक्षानगर येथे अत्यल्प गटासाठी ५ घरे असतील, घराची किंमत साडेसोळा लाख असेल. मानखुर्द येथे अत्यल्प गटासाठी ११४ घरे असतील, घराची किंमत सव्वा सत्तावीस लाख असेल. मुलुंड येथे अल्प उत्पन्न गटासाठी घरे असतील, घराची किंमत तीस लाख असेल. गोरेगाव येथे अल्प उत्पन्न गटासाठी २४ घरे असतील, घराची किंमत पावणे बत्तीस लाख असेल.
घाटकोपर येथे मध्यम उत्त्पन्न गटासाठी दोन घरे असतील, घराची किंमत ठरलेली नाही. विक्रोळी येथे मध्यम उत्पन्न गटासाठी सात घरे असतील, घराची किंमत ठरलेली नाही. महावीरनगर येथे मध्यम उत्पन्न गटासाठी १७० घरे असतील, घराची किंमत एकोणसाठ लाखांच्या आसपास असेल. घाटकोपर येथे उच्च उत्पन्न गटासाठी दोन घरे असतील, घराची किंमत ठरलेली नाही. सहकारनगर येथे उच्च उत्पन्न गटासाठी आठ घरे असतील, घराची किंमत ठरलेली नाही. परेल येथे ६८ घरे असतील, घराची किंमत ठरलेली नाही.